कांद्याच्या कोसळत्या दरासह इतर मागण्या, प्रहार संघटनेचे शिष्टमंडळ थेट बच्चू कडूंच्या घरी
कांद्याच्या कोसळत्या दराबाबत नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या एक शिष्टमंडळाने राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट (Onion Farmer Meet Bacchu kadu) घेतली.
नाशिक : कांद्याच्या कोसळत्या दराबाबत नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या एक शिष्टमंडळाने राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारकडून कांद्याला 300 ते 500 रुपये अनुदान देता येईल का? तसेच कांद्याची खरेदी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभावाने करावी, अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊ, असे आश्वासन बच्चू कडू यांनी त्या शिष्टमंडळाला दिले. (Onion Farmer Meet Bacchu kadu for various demand)
आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विक्री झालेल्या कांद्याला किमान 500 रुपये अनुदान मिळावे. तसेच साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे विक्री होणाऱ्या कांद्याची दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करावी. या मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने बच्चू कडूंची भेट घेतली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
या भेटीसाठी हे शिष्टमंडळ बच्चू कडूंच्या अमरावतीतील निवासस्थानी गेले होते. यावेळी या शिष्टमंडळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली. तसेच कोसळणाऱ्या कांद्याचे बाजार भावाला केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका शेतकऱ्यांनी यावेळी केली.
तसेच या प्रश्नी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. लवकरच शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून कसे बाहेर काढता येईल. त्यांना 300 ते 500 रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून देत येईल का? यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या शिष्टमंडळाला दिले. (Onion Farmer Meet Bacchu kadu for various demand)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यूhttps://t.co/6z1tqsUlHD
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2020
संबंधित बातम्या :
पायाला दुखापत, तरीही एकनाथ खडसे दूध आंदोलनात, मुक्ताईनगरमध्ये रास्ता रोको
Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर