AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचे दर कोसळले, निर्यातबंदी हटवण्याची मागणी

कांद्याच्या बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी कांद्याची निर्यात खुली करत, सर्वच निर्बंध कांद्यावरील हटवण्याची मागणी  केली (Stop Onion Export) जाते

कांद्याचे दर कोसळले, निर्यातबंदी हटवण्याची मागणी
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 3:32 PM

नाशिक : लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात प्रति क्विंटल मागे गुरुवारच्या तुलनेत आज 1 हजार रुपयांची मोठी घसरण होत (Onion Export ban lifted) आहे. कांद्याचे बाजारभाव 3 हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी कांद्याची निर्यात खुली करत, सर्वच निर्बंध कांद्यावरील हटवण्याची मागणी  केली (Onion Export ban lifted) जाते

अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लाल कांद्याची आवक मंदावल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. लासलगाव बाजार समितीत17 डिसेंबरला 11 हजार 111 रुपये इतक्या प्रतिक्विंटलला कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याची ऐतिहासिक नोंद झाली होती. त्यानंतर देशांतंर्गत बाजार समित्यांमध्ये दररोज कांद्याची आवक वाढत असल्यानं दीड महिन्यात बाजारभावात 80% घसरण झाली होती.

सध्या कांद्याचे बाजारभाव हे तीन हजार रुपयांच्या आत आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी एक हजार रुपयाची मोठी घसरण झाली होती. सोमवारी लासलगाव बाजार समितीत 20 हजार क्विंटलची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. त्याला जास्तीत जास्त 2851 रुपये, सरासरी 2300 रुपये, कमीत कमी 1000 रुपये इतका प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्यानं ही घसरण रोखण्यासाठी कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी या क्षेत्रातील जणाकार जयदत्त होळकर यांनी (Onion Export ban lifted) केली

अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र उत्पादनाच्या तुलनेत आज मिळणाऱ्या बाजारभावातून खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे कांद्यावरील सर्व निर्बंध हटवत कांद्याच्या बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी निर्यात खुली करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी गणेश कांदे यांच्यासह कांदा उत्पादक करत आहे

देशांतर्गत मागणी त्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नाही. त्यावेळी कांद्यावरुन निर्बंध लादणे कांद्याची निर्यातबंदी करणे, शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्याचे बाजारभाव कमी असताना कांदा खरेदी करून तो पुरवणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र कांद्याच्या बाजारभावात घसरण होते. त्यावेळेस तुटपुंजी मदत दिली जाते. तीही फार आरडाओरडा केल्यानंतर दिली जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. कांद्याला हमीभाव दिलाच पाहिजे. कांद्याची निर्यात बंदी खुली केली पाहिजे, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करू लागले (Onion Export ban lifted) आहे