तुम्हीही करताय ऑनलाइन व्यवसाय तर सावधान, क्षणात होऊ शकतात अकाऊंटमधले पैसे गायब
राज्यभरात सध्या आर्मी ऑफिसरचं नाव सांगून महिलांची ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. खोटे फोन करून हे लोक ऑनलाइन पैशांची लूट करतात.
नाशिक : सणासुदीच्या काळात छोटेखाणी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी ही बातमी आवश्य बघितली पाहिजे. आपण आपले प्रॉडक्ट जर ऑनलाईन विकत असाल तर जरा काळजीपूर्वक ही बातमी वाचा. राज्यभरात सध्या आर्मी ऑफिसरचं नाव सांगून महिलांची ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. खोटे फोन करून हे लोक ऑनलाइन पैशांची लूट करतात. अशा टोळीचा नाशिक पोलीस शोध घेत असून नागरिकांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (online fraudsters gang has been active across the state by naming army officers Nashik police alert )
आम्ही आर्मी डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी असून आपला माल आम्हाला विकत घ्यायचा आहे, असं सांगून हे लोक एक क्यूआर कोड पाठवतात. क्यूआर कोड स्कॅन करताच अकाउंटमध्ये असलेले पैसे अचानक गायब होतात. या टोळीचा माग सध्या नाशिक पोलीस घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे फोन आल्यास सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणी नाशिक पोलिसांनीदेखील आता तपासाची चक्रं फिरवली असून सायबर क्राईमच्या मदतीने या भुरट्या चोरांचा शोध सध्या सुरू आहे. कोरोनाची असलेली दहशत, त्यात घराबाहेर न पडण्याचा सर्वसामान्य लोकांचा असलेला कल यामुळे अनेक महिला सणासुदीचे व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करत आहेत. याचाच गैरफायदा घेत ही टोळी राज्यातल्या अनेक महिलांना गंडा घालून अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देते आहे.
कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सध्या बाहेर निघणं कठीण झालं आहे. अशात सगळेच जण ऑनलाइन पद्धतीने आपला व्यवसाय करत आहेत. पण यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. कुठे नोकरी देतो असं सांगून नागरिकांची फसवणूक होत आहेत तर कुठे अशा प्रकारे टेक्नोलॉजीचा चुकाची वापर करत फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवसाय करताना काळजी घ्यावी असं नाशिक पोलिसांनी आव्हान केलं आहे.
इतर बातम्या –
पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
चोरट्यांनी भर रस्त्यात बेदम मारहाण करत लुटलं, पोलिसांनी निळ्या रंगाच्या शर्टावरुन चोरांना पकडलं
VIDEO : मराठा विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार?, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव@AmitV_Deshmukh @CMOMaharashtra @VarshaEGaikwad #fees #Charges pic.twitter.com/GUvsn4lKT3
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
(online fraudsters gang has been active across the state by naming army officers Nashik police alert )