Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी शपथ घेतो की..’, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पालघर पोलिसांकडून शपथ

संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर वसईत पालघर पोलीस दलाकडून शपथ दिली जात आहे (Palghar police gives oath).

'मी शपथ घेतो की..', संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पालघर पोलिसांकडून शपथ
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 3:29 PM

पालघर : संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी पालघर पोलिसांनी (Palghar police gives oath) अनोखी शक्कल लढवली आहे. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर वसईत पालघर पोलीस दलाकडून शपथ दिली जात आहे. ही शपथ घेऊन तरी नागरिकांनी घराबाहेर पडायचं थांबवावं, असं आवाहन वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केलं आहे (Palghar police gives oath).

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. याप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग, वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या उपाययोजना राबवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हेही दाखल केले जात आहेत.

पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून नियम मोडणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याची शपथ दिली जात आहे.

पालघर पोलिसांनी तयार केलेली शपथ

कोरोणा विरुद्धची लढाई ही आपल्या सर्वांची लढाई आहे, यापुढे मी लॉकडाऊनचे आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करेन,

माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे मला, माझ्या घरच्या व्यक्तींना आणि इतर सहकाऱ्यांना कोरोनाचा धोका होणार नाही, याची मी काळजी घेईन.

शासनाच्या प्रत्येक सूचनेचे योग्य पालन करण्याची आणि आपला भारत देश कोरोना मुक्त करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची मी/आम्ही शपथ घेत आहे/आहोत.

संबंधित बातम्या :

सुनेला प्रसव वेदना, रात्रीच्या अंधारात सासू-सुनेची पायपीट, वर्दीतल्या साहेबांची माणुसकी

जे जोडे घालून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते जोडे विकून कोरोना लढ्यासाठी 3 लाख, गोल्फर अर्जुन भाटीचं कौतुक

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करा, भुजबळांचे आदेश

मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.