PHOTO : पन्हाळे धरणातून गळती, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणातून गळती होत असल्याने सध्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत (Panhale dam Leakage)
धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Follow us
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणातून गळती होत असल्याने सध्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सोमवारी रात्री पन्हाळे धरणातील सांडव्यातून गळती सुरु असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
सांडव्यातून चिखलयुक्त पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांना कल्पना दिली.
याबाबत तात्काळ रत्नागिरी उपविभागीय अधिकारी एस. व्ही. नलावडे यांना कळवण्यात आले.
रत्नागिरी येथून अधिकारी एस. व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली
सांडव्यातून गढूळ पाणी येत असल्याची पाहणी करुन पन्हाळे धरणातून रात्रीपासून पाण्याचा विसर्गास काही प्रमाणात सुरवात करण्यात आला आहे.
धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरणाच्या गळती विषयी अनेक तक्रारी करुन दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.