दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं.

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार
Follow us
| Updated on: Aug 17, 2019 | 4:22 PM

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं. मराठवाड्यातील नेहमीच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी, समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून, त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार आणि मांजरा उपखोऱ्यात वळविणेबाबतचे निवदेन पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

कशी असेल प्रस्तावित योजना?

भाग 1- जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा जलदगती प्रवाही कलवा 70 किमी काढणे.

भाग 2- मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पाचे  स्थैर्यकरण करणेसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळविणे.

मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली आणि मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.

प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6700 कोटी खर्च अपेक्षित असून, या योजनेचे सर्वेक्षण तात्काळ करण्याची मागणी  पंकजा मुंडेंनी केली.

जायकवाडी धरण भरलं

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. उत्तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरण भरलं. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धा फुटाने उचलून तब्बल 5700 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग करणयात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धारणाखाली असलेल्या नदी काठावरील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या 

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग, ड्रोनच्या माध्यमातून पाहा विहंगम दृश्य 

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं, अत्यल्प पावसाने अनेक गावात अजूनही टँकरने पाणी 

नाथसागर शंभरीकडे, प्रत्येक मराठवाडावासियाचं मन सुखावणारे फोटो 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.