PHOTO : पारनेरच्या नगरसेवकांचा प्रवास, शिवबंधन-घड्याळ ते पुन्हा शिवबंधन
अहमदनगरमधील पारनेरच्या पाच नगरसेवकांची चारच दिवसात शिवसेनेत घरवापसी (Parner Shivsena Corporators Returns in Party) झाली.

- अहमदनगरमधील पारनेरच्या पाच नगरसेवकांची चारच दिवसात शिवसेनेत घरवापसी झाली.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर या नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन बांधले.
- नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच नगरसेवकांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
- या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
- त्याच निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा शिवबंधन हाती बांधले.
- महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.