Patanjali CoronaVirus Medicine : कोरोनावर औषध तयार, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा दावा

पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी कोरोवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे (Patanjali CoronaVirus Medicine).

Patanjali CoronaVirus Medicine : कोरोनावर औषध तयार, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा दावा
फोटो सौजन्य : फेसबुक
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 5:08 PM

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला नष्ट करण्यासाठी लस तयार करण्याचं काम (Patanjali CoronaVirus Medicine) युद्ध पातळीवर सुरु आहे. भारतासह अनेक देशातील शेकडो वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी कोरोवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे (Patanjali CoronaVirus Medicine).

“पतंजलीने कोरोनाचं औषध तयार करण्यात यश मिळवलं आहे. या औषधाने आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत”, असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे.

“पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्टदेखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे”, असं आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.

औषध कसं तयार केलं?

“वेदांचा अभ्यास, आयुर्वेदिक वस्तू आणि वैज्ञानिक सिद्धांताचा अवलंब करुन कोरोनावर औषध तयार करण्यात आलं. हे औषध तयार करण्यासाठी पतंजलीच्या शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली”, असं आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.

“चीनमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेव्हाच औषध तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरु करण्यात आलं. शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. कोरोनावर मात करणारं औषध तयार झालं. या औषधाने आतापर्यंत शेकडो नागरिक बरे झाले आहेत”, असं पंतजलीच्या एका वैज्ञानिकाने सांगितलं.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या उंबरठ्यावर

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. देशभरात काल दिवसभरात (12 जून) 10 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या 2 लाख 97 हजार 535 इतकी आहे. यापैकी 8 हजार 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताने अवघ्या चार दिवसात सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी उडी घेतल्याने चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

Palkhi Sohala 2020 | तुकोबा- एकनाथांच्या पालख्यांचं प्रस्थान, सोशल डिस्टन्सिंगसह मोजकेच वारकरी

अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची किमया, कोरोनाग्रस्त महिलेवर गुंतागुंतीचे फुफ्फुस प्रत्यारोपण

Corona Update | भारतातील कोरोनाग्रस्त तीन लाखांच्या उंबरठ्यावर, दहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण, जगात चौथ्या स्थानी

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.