Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात पवित्रा पुनियाच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात पवित्रा पुनियाच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा!
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 8:44 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. मात्र, आता बिग बॉसच्या घरामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरण सुरू झाले आहे. पवित्रा पुनियाला एजाज खान आवडत आहे. कविता कौशकला बोलताना पवित्रा पुनिया सांगते की, मला एजाज खान आवडतो, पण माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे, ते मला माहिती नाही. एजाज खानला पवित्राच्या नावाने निक्की तांबोळी, जान कुमार सानू, कविता कौशिक चिडवताना दिसतात. (Pavitra Punia One sided love to Eijaz Khan in Bigg Boss house)

कविता कौशिक एजाज खान पवित्रा पुनियाबद्दल बोलते आणि सांगते की, पवित्रा पुनियाला तु आवडतो. यावर एजाज खान सरळ म्हणतो की, आमच्या दोघांच्या नात्याबद्दल तुला माहिती आहे, तिचे आणि माझे किती भांडण होतात आणि मला पवित्रा पुनिया आवडत नाही. त्यानंतर कविता कौशिक एजाज खानला फोर्स करते. पण तो सरळ म्हणतो की, मी इथे फक्त खेळण्यासाठी आलो आहे. मला माझे लक्ष फक्त खेळावर ठेवायचे आहे. मी येताना इथे एकटा आलो होतो आणि जाताना पण एकट्यालाच जायचे आहे. मी प्रेमाच्या भानगडीत पडलो तर सर्व विसरून जातो, असे म्हणत पवित्र पुनिया आपल्याला आवडत नसल्याचे त्याने सांगितले.

कॅप्टनपदाची धुरा एजाजच्या हातात बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन एजाज बनला आहे. रुबिना दिलैक आणि तिच्या टीमच्या म्हणण्यानुसार, एजाज नाहीतर अभिनव घराचा कॅप्टन झाला पाहिजे होता. रुबिना दिलैकच्या मते, एजाजच्या टीमने नियमांचे उल्लंघन जास्त केले तरी, देखील बिग बॉसने त्याकडे दुर्लक्ष केले आणि एजाजला घराचा कॅप्टन केले. बिग बॉसने जाणुनबुजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले, असे म्हणत तिने पुन्हा एकदा बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता सलमान खान शनिवारी आणि रविवारी याबद्दल रुबिना दिलैकला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही बिग बॉसवर अनेक हंगामात अशाच प्रकारचा आरोप करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Bigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुल वैद्य-जान सानू दरम्यान घमासान सुरूच!

(Pavitra Punia One sided love to Eijaz Khan in Bigg Boss house)

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.