मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, थेट पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा, पोलीस कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल

डोंबिवलीत मास्क न घातलेल्या तरुणांनी कारवाई करणाऱ्या पोलिसावर थेट कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (People not use mask and attack on Police through dog in Dombivali).

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, थेट पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा, पोलीस कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल
मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, थेट पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:11 PM

डोंबिवली (ठाणे) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं जरुरीचं आहे. मात्र, अजूनही काही नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून कडक कारवाई सुरु आहे. मात्र, कारवाई करणाऱ्या लोकांवरच आता हल्ला होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. डोंबिवलीत मास्क न घातलेल्या तरुणांनी कारवाई करणाऱ्या पोलिसावर थेट कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे (People not use mask and attack on Police through dog in Dombivali).

पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या कारवाई सुरु

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई पथकाकडून संयुक्तरित्या विनाकारण फिरणारे आणि मास्क न घालता फिरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु आहे. मात्र, डोंबिवली पूर्व भागातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने कारवाई पथक कारवाईसाठी फिरत असताना विचित्र प्रकार घडला.

आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले

परिसरात एका ठिकाणी गणेश ऑटोमोबाईल नावाचे गॅरेज सुरु होते. या गॅरेजसमोर तीन जण बसले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता. या दुकानात दोन पाळीव कुत्रे होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांना मास्क न घातल्याने पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितले. या तिघांनी कारवाईस विरोध केला. आरडाओरडा सुरु केला. पथकाच्या काही कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये पोलिस होते त्यांना धक्काबुक्की केली. कुत्र्याला छू म्हटल्याने त्या कुत्र्याने अनिल तायडे या पोलीस कर्मचाऱ्याचा चावा घेतला. (People not use mask and attack on Police through dog in Dombivali).

आरोपींना अटक

अनिल तायडे यांना कुत्र चावल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्या विरोधात कारवाई केली आहे. यापैकी दोन जणांना अटक केली असून पोलीस आादित्य गुप्ता याच्या शोधात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : VIDEO : नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या? थरार सीसीटीव्हीत कैद

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.