पंजाब, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रानेही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे, मविआ सरकारला नाना पटोलेंचा सल्ला !
पंजाब, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कर कपात करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याचं पटोले यांनी सांगितलं.
मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात वारंवार आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधतानाच महाराष्ट्र सरकारकडेही महत्वाची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही कर कपात करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Nana Patole advises Thackeray Government to reduce rates on petrol and diesel)
केंद्र सरकारने कर कपात करुन जनेतेला दिसाला दिला तसा राज्य सरकारनेही द्यावा अशी भाजपाकडून मागणी केली जात आहे. वास्तविक पाहता केंद्राकडून आकड्यांचा खेळ करुन दिलासा दिल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु यातून राज्य सरकारचा हिस्सा कमी होत आहे. पंजाब, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कर कपात करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याचं पटोले यांनी सांगितलं.
ज्या राज्यांत काँग्रेस पक्षाचं सरकार आहे तिथे इंधनाचे दर कमी केले आहेत. महाराष्ट्रात देखील आमची हीच भूमिका आहे.
कच्च्या तेलाचे दर कमी असताना सुद्धा जास्त पैसे घेऊन लूटमार करणाऱ्या व राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले#JanJagranAbhiyan pic.twitter.com/kK9zSW1G3e
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 17, 2021
‘मोदी सरकारकडून जनतेची लूट सुरु’
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केली. पेट्रोलवर 5 रुपये व डिझेलवर 10 रुपये कमी केले आहेत. पण दुसरीकडे सेस लावून लोकांची लूट सुरुच आहे. उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे राज्यांना मिळणारा यातला वाटा कमी होणार आहे. अगोदरच केंद्र सरकारने 1 मार्च 2021 पासून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत केंद्रीय उत्पादन शुल्कातून मिळणारे राज्य शासनाचे जवळपास 30 हजार कोटी रुपये हडप केले आहेत. केंद्र सरकार इंधनावर सेस वाढवून सामान्य जनतेचे आणि राज्य सरकारांचेही आर्थिक शोषण करत आहे, असा हल्लाबोल पटोले यांनी केलाय.
मागील १ वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्कामध्ये सेस वाढवून मोदी सरकारने राज्याचे ३० हजार कोटी हडप केले. जर टॅक्स लावला असता तर राज्याच्या तिजोरीत पैसे आले असते पण सेस लावून केंद्राने राज्याचे पैसे स्वतःच्या तिजोरीत वळवून घेतले: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले #JanJagranAbhiyan pic.twitter.com/1momAd4Uo8
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 17, 2021
कंगनाच्या वक्तव्यावरुन माध्यमांना सल्ला
त्याचबरोबर अभिनेत्री कंगणा राणावत वारंवार बाष्कळ बडबड करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अवमान करत आहे. कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये, ही आमची विनंती आहे, असं आवाहन पटोले यांनी माध्यमांना केलं.
काही कलाकारांना हाताशी धरुन त्यांना पद्मश्री देऊन खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लोकांबद्दल अशी वक्तव्य असतील तर विचार केला पाहिजे की देश कोणत्या दिशेने जात आहे: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले#JanJagranAbhiyan pic.twitter.com/ybJtgBygqG
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 17, 2021
भाजपनं भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
पटोले पुढे म्हणाले की, कंगणा जी बडबड करत आहे ती भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे. याला भाजपचाही पाठिंबा आहे असा आमचा आरोप आहे. भाजपने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान पटोले यांनी दिलंय.
इतर बातम्या :
MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?
Nana Patole advises Thackeray Government to reduce rates on petrol and diesel