PF : पीएफसंदर्भात महत्वाची बातमी, टॅक्स रिटर्न फाईलिंगमध्ये होऊ शकतो उशिर, वाचा आणि पटकन करा हे काम

पीएफ खात्याचे दोन भागात विभाजन करण्याच्या कामात विलंब होऊ शकतो. त्यामुळे पीएफ खात्यात अडीच लाखांपेक्षा जास्त ठेवींच्या व्याजांवर कर आकारला जाऊ शकतो. यासाठी पीएफ खाते करपात्र आणि करपात्र नसलेल्या खात्यांमध्ये विभागले जाईल. नेमका काय प्रकार आहे. जाणून घेऊया...

PF : पीएफसंदर्भात महत्वाची बातमी, टॅक्स रिटर्न फाईलिंगमध्ये होऊ शकतो उशिर, वाचा आणि पटकन करा हे काम
ईपीएफओImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 6:44 PM

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (EPFO) अद्यापही पीएफ खाते दोन स्वतंत्र्य खात्यांमध्ये विभागलेला नाही. भविष्या भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावर (epf intrest) कर आकारण्याचा नियम जारी करण्यात आलेला आहे. तेव्हापासून पीएफ (PF) खात्याची दोन खात्यांमध्ये (Account) विभागणी करण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये एक खाते करपात्र असेल तर दुसरे खाते हे नॉन टॅक्सेबल असणार आहे. ज्यांच्या खात्यात गेल्या आर्थिक वर्षात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. अशा पीएफ सदस्यांसाठी करपात्र आणि करपात्र नसलेली खाती तयार केली जातील. मात्र, ईपीएफओने अद्याप हे काम केलेले नाही. त्यामुळे कर भरण्यास आणि कर विवरणपत्र भरण्यास विलंब होऊ शकतो. काही तज्ज्ञांनी ईटी वेल्थली देलेल्या माहितीनुसार, पीएफ खाते दोन खात्यांमध्ये विभागण्याचे काम सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये केले जाऊ शकते. त्यानंतर 2021-22 साठी व्याजाचे पैसे पीएफ खात्यात जमा केले जातील.

रिटर्न भरण्यात येणार अडचण

EPFO ने 2021-22 साठी ठेवींवर 8.1 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत 8.1 टक्के व्याजदराचा निर्णय घेण्यात आला आहे.  याला अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने पीएफ खात्याच्या व्याजावर कर लावण्याचा नियम लागू केला होता. नियमांनुसार, जर एखाद्या सदस्याने एका वर्षात पीएफ खात्यात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याच्या व्याजावर कर आकारला जाईल. प्राप्तिकर विवरणपत्र 31 जुलैपर्यंत भरावे लागणार आहे. त्यामुळे पीएफ खात्याचे दोन भागात विभाजन न झाल्यामुळे आणि करविषयक बाबी स्पष्ट न झाल्यामुळे रिटर्न भरण्यात अडचण येऊ शकते.

कर भरणाऱ्यांसाठी महत्वाचे

दोन स्वतंत्र्य खाती तयार न केल्यामुळे पीएफ व्याजावर कर कसा आकारला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या आर्थिक वर्षाच्या पीएफ व्याजाचे पैसे खात्यात जमा झाल्यावरच खाते वेगळे करण्याचे काम केले जाईल, असे मानले जाते. हे काम सप्टेंबर आणि डिसेंबरमध्येच होऊ शकते कारण व्याजाचे पैसै एकाच वेळी जामा होतात. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, दोन खाती तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. ईपीएफओ त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. ही नवीन प्रणाली कधीही लागू होऊ शकते. पीएफ व्याजावरील कराच्या श्रेणीत फक्त ते लोक येतील ज्यांचे वार्षिक मूळ वेतन 21 लाख रुपये आहे.

इतर बातम्या

वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कायापालट करणार; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?

Nalasopara: ऑफिसात घुसला साप, कॅबिनेमध्ये साप पाहून एकच थरकाप! पाहा CCTV Video

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.