PF UPDATE: नोकरी बदलणाऱ्यांसाठी कामाची बातमी! पीएफ बॅलन्स ऑनलाईन ट्रान्सफर कसा करावा?

पीएफ ट्रान्सफरसाठी ना कागदपत्रांची गरज असते ना कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता. तुम्ही अगदी घरबसल्या तुमचे अकाउंट ट्रान्सफर करू शकतात. UAN (UNIVERSAL ACCOUNT NUMBER) युनिव्हर्सल अकाउंट नंबरच्या निर्मितीमुळे पीएफ ट्रान्सफर अत्यंत सुलभ बनले आहे.

PF UPDATE: नोकरी बदलणाऱ्यांसाठी कामाची बातमी! पीएफ बॅलन्स ऑनलाईन ट्रान्सफर कसा करावा?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 8:04 PM

नवी दिल्ली – नवीन नोकरीच्या (JOB SWITCH) ठिकाणी रुजू होताना बँक खात्यापासून हेल्थ पॉलिसीपर्यंत अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागते. नोकरी बदल्यानंतर सर्वात महत्वाचं ठरतं पीएफ अकाउंट अपडेट (PF ACCOUNT UPDATION) करणं. नवीन नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पीएफ बॅलन्स ट्रान्सफर केल्यास होणाऱ्या आर्थिक भुर्दंडापासून दिलासा मिळतो. पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी मोठी कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागत असल्याचा अनेकांचा समज असतो. पीएफ कार्यालयाला भेट द्यावी लागणे गरजेचे असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, पीएफ ट्रान्सफरसाठी ना कागदपत्रांची गरज असते ना कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता. तुम्ही अगदी घरबसल्या तुमचे अकाउंट ट्रान्सफर करू शकतात. UAN (UNIVERSAL ACCOUNT NUMBER) युनिव्हर्सल अकाउंट नंबरच्या निर्मितीमुळे पीएफ ट्रान्सफर अत्यंत सुलभ बनले आहे. तुम्ही नव्या नोकरीच्या ठिकाणी तुमचा UAN नंबर शेअर करणे अत्यंत महत्वपूर्ण ठरते.

‘ईपीएफओ’ने ट्विटर हँडलवरुन पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्याच्या 6 पद्धती सांगितल्या आहेत.

पायरी 1-

सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना ‘ईपीएफओ’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायला हवी. यूएएन आणि पासवर्ड एन्टर करून लॉग-इन करावे.

पायरी 2-

तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या ‘One member-One EPF Account’ (ट्रान्सफर विनंती) वर क्लिक कराव लागेल.

पायरी 3-

तुम्हाला वैयक्तिक माहितीची आणि नवीन PF अकाउंटची पडताळणी करणे बंधनकारक असेल.

पायरी 4-

तुम्हाला त्यानंतर मागील पीएफ अकाउंटचे तपशील मिळविण्यासाठी ‘Get Details’ (तपशील मिळवा) वर क्लिक करावे लागेल.

पायरी 5-

उपलब्ध प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी तुम्हाला वर्तमान किंवा मागील नोकरीच्या अधिकाऱ्यांची निवड करावी लागेल. तुम्ही दोघांपैकी एकाची निवड करावी आणि तुमचा सदस्य ID/UAN प्रदान करावा.

पायरी 6-

तुम्हाला ओटीपी मिळविण्यासाठी ‘Get OTP’ (ओटीपी मिळवा) वर क्लिक करावे लागेल. UAN नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी एन्टर केल्यानंतर सबमिट करा बटणावर क्लिक करा.

वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमची EPF ट्रान्सफर विनंती मंजूर केली जाईल. तुमची विनंती मंजूर झाल्यानंतर नव्या पीएफ अकाउंटमध्ये पुढील पीएफची रक्कम वर्ग केली जाईल.

संबंधित बातम्या :

मंदीत संधी: देशात 3 महिन्यांत 3 कोटी रोजगार निर्मिती, महाराष्ट्र आघाडीवर!

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.