कॉलेज कँटीनमधून पिझ्झा-बर्गर हद्दपार, प्राध्यापकांवर देखरेखीची जबाबदारी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी पिझ्झा-बर्गर यासारखे जंक फूड दूर करण्याचा निर्णय नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतला आहे

कॉलेज कँटीनमधून पिझ्झा-बर्गर हद्दपार, प्राध्यापकांवर देखरेखीची जबाबदारी
Follow us
| Updated on: Aug 21, 2019 | 12:15 PM

नागपूर : कॉलेजच्या कँटीनमध्ये पिझ्झा-बर्गर (Pizza Burger) खाण्याची सवय असलेल्या विद्यार्थ्यांची आता अडचण होणार आहे. कारण महाविद्यालयातील उपाहारगृहांमध्ये पिझ्झा आणि बर्गरची नाकाबंदी करण्यात आली आहे. महाविद्यालयातील कँटीनमध्ये यासारखे खाद्यपदार्थ दिसल्यास प्राध्यापक आणि कँटीनचालकावर कारवाई होणार आहे. नागपूर विभागातल्या तब्बल 265 महाविद्यालयांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाने याबाबत पत्रंही पाठवलं आहे.

आजकाल सुपरफास्टचा जमाना आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी महाविद्यालयात जाताना घरचा डबा घेऊन जात नाहीत. महाविद्यालयातील कँटिनमध्ये पिझ्झा आणि बर्गरसारख्या खाद्यपदार्थावर ताव मारण्यास ते पसंती देतात. पण आता नव्या नियमानुसार महाविद्यालयातून पिझ्झा आणि बर्गरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नागपूर शहरातील 68, तर विभागातील 265 महाविद्यालयांना याबाबत अन्न आणि औषध विभागाने पत्रं पाठवलं आहे.

महाविद्यालयातील कँटीनमध्ये जी मुलं रोज पिझ्झा आणि बर्गरवर ताव मारतात, ते विद्यार्थी अन्न विभागाच्या या नव्या निर्णयाचा विरोध करत आहेत. काही जणांनी मात्र महाविद्यालयात पिझ्झा आणि बर्गरच्या नाकाबंदीचं समर्थन केलं आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी महाविद्यालयातील कँटीन्सवर लक्ष ठेवणार आहेत. जर महाविद्यालयातील कँटीनमध्ये पिझ्झा किंवा बर्गरसारखे पदार्थ आढळले, तर कँटीनचालकासह कॉलेजमधील प्राध्यापकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

तरुण पिढीत पिझ्झा आणि बर्गरची मोठी क्रेझ आहे. जिभेला चव म्हणून महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात जंक फूडच्या आहारी जातात. यामुळेच लठ्ठपणा आणि इतर आजारांनाही सुरुवात होते. यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी अन्न आणि औषध विभागाचे प्रयत्न सुरु आहे. त्यात किती यश मिळतं, हे येणारा काळच ठरवेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.