‘मन की बात’मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता रेडिओवर 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company). 

'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 3:49 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi)   यांनी आज (27 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता रेडिओवर ‘मन की बात’ (Mann ki Baat) कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक केलं (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company).

“महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उत्तम उदाहरण हे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आहे. हा शेतकऱ्यांचा एक समूह आहे. पुणे-मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे 70 गावांमधील 4 हजार 500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. रोजगार मिळवतात”, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी काय म्हणाले?

“प्रिय देशवासियांनो, जो जमिनीशी एकरुप असतो, शेतीचं काम करतो त्याच्यात मोठ्या वादळांना झेलण्याची क्षमता असते, असं म्हटलं जातं. कोरोना संकटात आपले शेतकरी, कृषी क्षेत्र याचं जीवंत उदाहरण आहे. या संकट काळातही आपले शेतकरी शेतात राबत होते. आपले शेतकरी, कृषी क्षेत्र, गाव हे ‘आत्मनिर्भर भारत’चे आधार आहेत. हे आधार मजबूत झाले तर आत्मनिर्भर भारतची संकल्पना आणखी घट्ट होईल”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“मला अनेक शेतकऱ्यांचे पत्र येतात. शेतकरी संघटनांशीदेखील माझी चर्चा होते. शेतीतील बदल आणि नव्या आव्हानांविषयी ते माहिती देतात”, असं मोदींनी सांगितलं.

“गेल्या काही काळात कृषी क्षेत्रातील अनेक बंधनं तोडण्यात आले आहेत. हरियाणात 2014 साली फळ आणि भाज्यांना एपीएमसी अ‍ॅक्टमधून बाहेर काढण्यात आलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शेतकरी शेतात पिकवलेले फळ, भाज्या कुठेही कुणालाही विकू शकतात. आता तसाच फायदा देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनाही होईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company).

संबंधित बातम्या : 

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.