PHOTO: देशातील पहिल्या सी-प्लेनची गगन भरारी, वैशिष्ट्यं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी देशातील पहिल्या सी-प्लेनचं उद्धाटन केले. (PM Modi Inaugurates India first Seaplane Service)
Follow us
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहे. मोदींनी गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देशातील पहिल्या सी-प्लेनचं लोकार्पण केले.
सी-प्लेन साबरमती रिव्हरफ्रंट ते केवाडिया़ परिसरात गगनभरारी घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी स्वत: केवडियापासून ते साबरमतीपर्यंत सी-प्लेनमधून प्रवास केला.
जमीन आणि पाण्यावर उड्डाण करणाऱ्या सी प्लेन फक्त 300 मीटर रनवेवरून ते उड्डाण करू शकते. यासाठी एखाद्या जलाशयातील 300 मीटर धावपट्टीचासुद्धा वापर करता येणार आहे.
हे अॅफिबियस कॅटेगरीतील विमान असून यातून एकावेळी 14 ते 19 जण प्रवास करू शकतात. यात 4 क्रू मेंबर आणि 14 प्रवासी असतील.
सी-प्लेनची संपूर्ण सेवा ही स्पाईस जेटच्या स्पाईस शटल या कंपनीकडून देण्यात येत आहे.
आजपासून सी-प्लेनच्या सेवेचा शुभारंभ झाला असून अहमदबाद ते केवाडिया या मार्गावर दररोज दोन उड्डाण असणार आहेत. यात 45 मिनिटात 220 किमीपर्यंतचा प्रवास केला जाणार आहे.
अहमदाबाद ते केवाडिया आणि केवाडिया ते अहमदाबाद या दोन्ही मार्गांवरील प्रवासाचे 3 हजार रुपये भाडे घेतले जाणार आहे. तर एका मार्गावरील प्रवासाकरिता 1500 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
आजपासून सी प्लेनच्या ऑनलाईन तिकीट बुकींगला सुरुवात झाली आहे.
गुजरात दौऱ्यादरम्यान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.