VIDEO : मोदींच्या आवाहनाला आईचाही प्रतिसाद, हीराबेन यांचा घरात थाळीनाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (22 मार्च) देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले (Narendra modi mother hiraben) होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (22 मार्च) देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले (Narendra modi mother hiraben) होते. त्यानुसार देशभरात आज सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. हा कर्फ्यू उद्या (23 मार्च) सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. यावेळी मोठ्या संख्येने देशातील नागरिकांनी टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे यामध्ये मोदींची आई हीराबेन यांनीही टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
PM @narendramodi‘s mother Hiraba Modi at Gandhinagar.#JantaCurfew#clapforourcarers#JanataCurfew pic.twitter.com/5JOHeqs97W
— Doordarshan National (@DDNational) March 22, 2020
“कोरोनाच्या लढाईचं नेतृत्व करणाऱ्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे मी आभार व्यक्त करतो. हा ध्वनी धन्यवाद करण्याचा होता तसाच एका विजयाच्या सुरुवातीचाही ध्वनी आहे. चला तर याच संकल्पासह आणि संयमासह एका मोठ्या लढाईसाठी स्वतःला काही बंधनांनी बांधूया.”, असं ट्वीट करत मोदींनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.
कोरोना वायरस की लड़ाई का नेतृत्व करने वाले प्रत्येक व्यक्ति को देश ने एक मन होकर धन्यवाद अर्पित किया। देशवासियों का बहुत-बहुत आभार… #JantaCurfew
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
मोदींनी आव्हान केल्यानंतर अनेक दिग्गज राजकीय नेते तसेच बॉलिवडू कलाकारांनीही टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता.
दरम्यान, कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस भारतात वाढत असल्यामुळे देशातील 75 जिल्हे पूर्णपणे लॉक डाऊन ठेवण्यात आले आहे. आतापर्यं देशात 300 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.