Unlock 2.0 l आता अनलॉक 2.0 चं नियोजन करा, पंतप्रधान मोदींच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (17 जून) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, दिल्लीसह इतर 20 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत (PM Narendra Modi on Unlock 2.0) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (17 जून) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, दिल्लीसह इतर 20 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत (PM Narendra Modi on Unlock 2.0) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना अनलॉक 2.0 बाबत नियोजन करण्याचा सल्ला दिला. याशिवाय देशभरात पुन्हा लॉकडाऊन घोषित होणार नसून याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, असंदेखील मोदींनी स्पष्ट केलं आहे (PM Narendra Modi on Unlock 2.0).
“अनलॉक 1.0 नंतर ही आपली पहिली भेट आहे. आता आपल्याला अनलॉक 2.0 बद्दल विचार करायला हवा. याशिवाय कोरोना नियंत्रणात कसा येईल, यासाठीदेखील प्रयत्न करायचे आहेत”, असं पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
“हे खरं आहे की, काही मोठे राज्य आणि शहरांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. तरीही देशाच्या नागरिकांचा संयम, प्रशासनाची तत्परता आणि कोरोना योद्ध्यांच्या कार्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही”, असंदेखील पंतप्रधान म्हणाले.
“देशात आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडणार आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार करता आपल्याला अनलॉक 2.0 चं नियोजन करण्याची तयारी सुरु करायला हवी. अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येण्याचे संकेत दिसत आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची नोंद करावी. संशयितांना क्वारंटाईन करावं. याशिवाय रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी”, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या.
दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकार कशाप्रकार नियोजन करत आहे, याचीदेखील माहिती दिली.
संबंधित बातम्या :
Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांला कोरोना, आप आमदारालाही लागण