‘जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही, हेच आमचं धोरण’; मोदींनी सांगितला विजयाचा मंत्र

'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'सह 'जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही' हेच आमचं धोरण आहे. त्यामुळेच भाजपला बिहारसह देशभरातील निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. (pm narendra modi reaction on bihar election victory)

'जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही, हेच आमचं धोरण'; मोदींनी सांगितला विजयाचा मंत्र
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 9:02 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभेसह देशात विविध ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयाचं गमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’सह ‘जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही’ हेच आमचं धोरण आहे. त्यामुळेच भाजपला बिहारसह देशभरातील निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. (pm narendra modi reaction on bihar election victory)

बिहारमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयासमोर झालेल्या धन्यवाद रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयाचं रहस्य सांगितलं. बिहार सगळ्यात खास आहे. जनतेने बिहारमध्ये एनडीएला स्पष्टपणे बहुमत दिलंय. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला आहे. बिहारमधील गरीब, माता-भगिनींसह प्रत्येक घटक जिंकला आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. भाजप हा सर्वांचाच पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अहोरात्र मेहनत घेतो. जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतो. जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही, हेच आमचं धोरण आहे, असंही ते म्हणाले. काल जे निकाल आले त्याचा अर्थ खोल आहे. त्याचे उद्दिष्टे खूप मोठे आहेत. भाजप पूर्वेत जिंकला. भाजपला गुजरात, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात विजय मिळाला. दोन केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक झाली. लडाख, दीव-दमनमध्ये भाजपचा विजय झाला. देशाच्या प्रत्येक नागरिकाने भाजपला वाढवले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

21व्या शतकातील भारत हा नवा भारत आहे. आम्हाला ना नैसर्गिक संकटं रोखू शकत, ना कोणतीही आव्हाने रोखू शकत. मी एका नव्या भारताचा होणारा उदय पाहत आहे. आत्मविश्वासाने भरलेला. सामर्थ्यशाली म्हणून ओळख असलेला भारत मी पाहत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यात गरिब, पीडित, दलित, शोषित, वंचित आपलं भविष्य बघतात. देशातील प्रत्येक घटकाचा विचार भाजपमध्ये केला जातो. त्यामुळेच जनतेचा भाजपवर विश्वास वाढला आहे. भाजपवर जनतेचा आशीर्वाद आणि स्नेह निरंतर वाढत चालला आहे, असं सांगतानाच बिहारमध्ये पक्षाने अगोदरपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. गुजरातमध्ये भाजप 90 व्या दशकापासून आहे. मध्यप्रदेशातही भाजप सत्तेत आहे. देशातील नागरिक भाजपवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहेत, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी देशातील युवकांना भाजपमध्ये सामिल होण्याचं आवाहन केलं. देशातील युवकांनो, भाजपमध्ये सामिल व्हा. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांनी भाजपमध्ये सामील व्हावं. युवकांनी आपल्या स्वप्नांसांठी भाजपमध्ये यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

Prime Minister Narendra Modi : भाजपकडे सायलंट व्होटर; तोच भाजपला निरंतर मतदान करतोय : नरेंद्र मोदी

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Prime Minister Narendra Modi LIVE : संकट काळात निवडणूक घेऊन भारताची ताकद दाखवली- नरेंद्र मोदी

(pm narendra modi reaction on bihar election victory)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.