5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील दिवे बंद करा; बाल्कनीत दिवे लावा : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं.

5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील दिवे बंद करा; बाल्कनीत दिवे लावा : मोदी
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 9:47 AM

नवी दिल्ली :  “कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे (PM Narendra Modi). या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला केलं.

“कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही”, असंदेखील नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

कोरोना जागतिक महामारीच्या विरोधात देशव्यापी लॉकडाऊनला आज 9 दिवस होत आहेत. या दरम्यान आपण सगळ्यांनी ज्याप्रकारे प्रतिसाद दिला तो अभूतपूर्व आहे. शासन, अनुशासन आणि जनता जनार्दन मिळून या स्थितीला चांगल्याप्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केला. आपण 22 मार्चला रविवारी ज्याप्रकारे कोरोनाविरोधात लढाई करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले ते आज जगभरातील सर्व देशांसाठी आदर्श बनलं आहे. आज कित्येक देश या गोष्टीचं कौतुक करत आहेत. जनता कर्फ्यू, घंटानाद या कार्यक्रमातून देशाच्या सामूहिक शक्तीचं दर्शन घडलं. देश एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढाई लढू शकतो हा भाव यातून प्रकट झाला.

देशातील कोट्यवधी लोक घरात आहेत. सगळ्यांना वाटत असेल की एकटं काय करायचं? एवढी मोठी लढाई एकटं कसं लढणार? किती दिवस असेच जातील? असे प्रश्न अनेकांना पडतील. मात्र, ही लॉकडाऊनची वेळ जरी असली किंवा आपण आपापल्या घरात जरी असलो तरी आपल्यापैकी कुणीही एकटं नाही. 130 कोटी जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येकासोबत आहे.

जनता जनार्धन इश्वराचंच रुप असतं, असं आपल्या इथे मानलं जातं. त्यामुळे जर देश एवढी मोठी लढाई लढत असेल तर जनतेच्या महाशक्तीचा साक्षात्कार करायला हवा. हा साक्षात्कार आम्हाला मनोबल, ध्येय आणि ध्येय प्राप्तीसाठी ऊर्जाही देतो. यामुळे आपला ध्येयाचा मार्ग अधिक स्पष्ट दिसतो.

कोरोना महामारीच्या या अंधकारात आपल्याला प्रकाशाच्या मार्गाने जायचं आहे. हा मार्ग कोरोनाच्या संकंटपेक्षा सर्वात जास्त प्रभावित आहे. आमचे गरिब भाऊबहिण यांच्या मनात कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या निराशाला आशेच्या बाजूला घेऊन जायचं आहे.

कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.