पुण्यातील 200 पेक्षा अधिक उद्यानं 4 महिन्यांपासून बंद, पालिका उत्पन्नाला कोट्यावधींचा फटका

पुण्यातील उद्यानं तब्बल 4 महिन्यांपासून बंद असल्याने महानगरपालिकेला सुमारे दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे (PMC Gardens and Parks in Pune closed).

पुण्यातील 200 पेक्षा अधिक उद्यानं 4 महिन्यांपासून बंद, पालिका उत्पन्नाला कोट्यावधींचा फटका
Follow us
| Updated on: Aug 11, 2020 | 8:12 AM

पुणे : कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून पुणे महानगरपालिकेने उद्यानं बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता या निर्णयाला तब्बल 4 महिने उलटले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला सुमारे दीड कोटी रुपयांचा फटका बसला आहे (PMC Gardens and Parks in Pune closed). एकूणच पालिकेच्या इतर क्षेत्रातील महसूल उत्पन्नातही मोठं नुकसान झालं आहे. ऐन उन्हाळी सुट्टीतच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुण्यातील सर्व प्रमुख उद्यानं बंद ठेवावी लागली. त्यामुळेच पालिकेच्या उत्पन्नाला हा मोठा फटका बसला.

पुणे शहरात महानगरपालिकेची 200 पेक्षा अधिक उद्यानं आहेत. त्यातील कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पेशवे उद्यानातील साहसी खेळ आणि फुलराणी, कात्रज तलाव परिसरातील फुलराणी तसेच संभाजी उद्यानातील मत्स्यालय, सहकारनगरमधील फोर-डी आणि 7 आश्‍चर्य उद्यान, वडगावशेरी येथील बुलेट ट्रेन असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, औंधमधील ग्रामीण संस्कृत्तीचे दर्शन घडवणारे निह्मण उद्यान, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ही उन्हाळी सुट्टीत गर्दीने भरलेली असतात.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मात्र, यावर्षी मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन असल्याने सर्व उद्यानांना टाळे लागले आहे. उन्हाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये उद्यान विभागास वर्षभरातील सर्वाधिक म्हणजे 1 ते सव्वा कोटी रुपयांवर उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे या वर्षी पालिकेने अनेक उद्यानांचे प्रवेश शुल्क दुपटीने वाढवले होते. त्यामुळे पालिकेच्या यावर्षीच्या उत्पन्नात आणखी मोठी भर पडणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनने पालिकेचं आर्थिक गणित चांगलंच बिघडवलं आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, पुण्यात गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर घटल्याने पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी (10 ऑगस्ट) कोरोनाचे नव्याने 1 हजार 806 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 761, तर पिंपरी -चिंचवडमधील 721 रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचीही आकडेवारी वाढती आहे. काल पुणे शहरात 31 आणि पिंपरी-चिंचवडमधील 12 जणांसह एकूण 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

पुण्यात पाच वर्षांपूर्वी 50 लाखांची घरफोडी, पोलिसांकडून नाट्यमय उकल, दोन अट्टल चोरटे ताब्यात

Ganeshotsav 2020 | दगडूशेठ गणपतीची 127 वर्षांची परंपरा खंडित, यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

PMC Gardens and Parks in Pune closed

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.