पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (PMPL Bus start in Pimpri-Chinchwad) आहे.

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 9:11 AM

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (PMPML Bus start in Pimpri-Chinchwad) आहे. पण आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. पिंपरीत 26 मे पासून पीएमपीएमएलची बस वाहतूक सेवा सुरु होणार आहे. येत्या दोन दिवसात या वाहतुकीचे वेळापत्रक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला (PMPML Bus start in Pimpri-Chinchwad) आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी वगळले आहे. त्यामुळे या शहरावरील अनेक निर्बंध आता कमी झालेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये किमान 15 मार्गांसाठी बस सेवा सुरू होणार आहे.

पिंपरी-चिंचवडला रेड झोनमधून वगळले असले तरी पुणे शहराचा समावेश कोरोनाच्या रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये बससेवा सुरू होऊ शकणार नाही. तसेच, पिंपरी-चिंचवडमधूनही पुण्यात बससेवा सुरू करणे शक्य नाही.

पीएमपीएमएलच्या मोठ्या बसमध्ये 21 तर, मिनी बसमध्ये 14 प्रवासी प्रवास करु शकतील. तसेच प्रवाशांसाठी बसण्याचीही विशिष्ट व्यवस्था करण्यात येणार आहे. बससेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 100 बस वापरण्यात येतील. प्रवाशांच्या गरजेनुसार ही संख्या कमी-जास्त होऊ शकते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 252 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 154 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये शहरातील 142 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका 21 मे 2020 पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी :

1) प्रभाग अ – निगडी, प्रधिकरण, आकुर्डी- 48

2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 06

3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी – 02

4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे – 04

5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 18

6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 07

7) प्रभाग ग – पिंपरी थेरगाव रहाटणी – 05

8) प्रभाग ह – दापोडी कासरवाडी सांगवी – 03

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात सात रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीला कोरोनाचा विळखा

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी

साताऱ्यातील कोरानाबाधितांचा आकडा दोनशेपार, निम्म्याहून अधिक कोरोनामुक्त

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.