सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं, औरंगाबादेतील तरुणाला अटक

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Police arrested youth for making offensive comments on Sonakshi Sinha).

सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं, औरंगाबादेतील तरुणाला अटक
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 2:21 PM

औरंगाबाद : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह शब्दात कमेंट करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत गुलाब जाधव असं आरोपीचं नाव आहे. त्याने सोनाक्षीसह बॉलिवूडच्या इतर कलाकारांबाबतही वादग्रस्त कमेंट केली होती. याप्रकरणी सोनाक्षीने मुंबई पोलिसांकडे 7 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती (Police arrested youth for making offensive comments on Sonakshi Sinha).

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर महिला सुरक्षा, सायबर बुलिंग या विषयांशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमार्फत तिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस’ अशी मोहिम सुरु केली. मात्र, तिच्या व्हिडीओवर शशिकांत जाधवने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

सोनाक्षीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु करत आरोपी शशिकांत जाधवविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांचा याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे (Police arrested youth for making offensive comments on Sonakshi Sinha).

दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन महिलांना छळणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे कारवाई केली जाईल, असा इशारा तिने दिला. याशिवाय महिलांना ऑनलाईन छळणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एकत्र या, असं आवाहनही तिने केलं आहे.

हेही वाचा : औरंगाबादेत निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, प्रशासनाला जाग न आल्यास कोरोना रुग्णांचाही उपचार बंद करण्याचा इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.