CORONA UPDATE : 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

CORONA UPDATE : 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 7:48 AM

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत. तर दुसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सिरमच्या अदर पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.(PM Narendra Modi will visit Seram Institute)

100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळतंय. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. पंतप्रधान मोदी हे 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट भारतात डिसेंबरपर्यंत 10 कोटी डोस पुरवणार

संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.

सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल चांगले आले असून आता लस रुग्णांच्या वापरासाठी तयार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे.

‘सिरम’ची कोरोना लस 225 रुपयांना!

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क

Prime Minister Narendra Modi will visit Seram Institute along with ambassadors from 100 countries

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.