प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री, काही सेकंदात हजारो फॉलोअर्स
नवी दिल्ली : राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरही एन्ट्री घेतली आहे. ट्विटरवर @priyankagandhi या युजरनेमने अकाऊंट उघडून प्रियांका गांधी तरुणर्गाशी संवाद साधण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘प्रियांका गांधी वाड्रा’ असे ट्विटर हँडलचे नाव आहे. ट्विटरनेही त्यांचे हँडल तातडीने व्हेरिफाईड केलं आहे. “हे प्रियांका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आहे. प्रियांका गांधी या काँग्रेसचे […]
नवी दिल्ली : राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरही एन्ट्री घेतली आहे. ट्विटरवर @priyankagandhi या युजरनेमने अकाऊंट उघडून प्रियांका गांधी तरुणर्गाशी संवाद साधण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘प्रियांका गांधी वाड्रा’ असे ट्विटर हँडलचे नाव आहे. ट्विटरनेही त्यांचे हँडल तातडीने व्हेरिफाईड केलं आहे.
“हे प्रियांका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आहे. प्रियांका गांधी या काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.” अशी माहिती ट्विटरच्या प्रोफाईलमध्ये देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणसीपदी नियुक्ती केली होती. याच पदाच्या माध्यमातून प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला होता. आता त्यांनी सोशल मीडियावरुन तरुणाईशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
‘या’ सात जणांना फॉलो
प्रियांका गांधी या सध्या केवळ सात जणांना फॉलो करत आहेत. त्यात राहुल गांधी, काँग्रेस, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला या ट्विटर अकाऊंट्सचा समावेश आहे.
कोण आहेत प्रियांका गांधी?
प्रियांका गांधी या भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची नात, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कन्या आहेत. प्रियांका यांच्या आई म्हणजे सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत, तर भाऊ राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
गांधी कुटुंब भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच राजकारण आणि समाजकारणात सक्रीय राहिलं आहे. प्रियांका गांधी यांच्या आजीचे वडील म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल योगदान दिलं, तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताची घडी बसवण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आता याच कुटुंबातील नवी पिढी म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या राजकारणात सक्रीय झाले आहेत.
नेहरु-गांधी कुटुंबाने भारताच्या जडण-घडणीत मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे याच कुटुंबातील प्रियांका गांधी यांच्या कामगिरीकडे आणि वाटचालीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बतम्या :
प्रियांका गांधी ‘हुकमाची राणी’, शिवसेनेकडून कौतुक
प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय, पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी वर्णी
‘प्रियांका राजकारणात येईल, तेव्हा लोक मला विसरतील’