दिल्लीत शहिदांना मोदींची मानवंदना, पार्थिव मूळ गावी नेणार
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे […]
Follow us on
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहत होता.
शहीद जवानांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्लीत आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जवानांचे पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळाहून आता मूळ गावी नेण्यात येणार आहेत. शहिदांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचाही समावेश आहे. हे दोघेही जवान बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.
LIVE UPDATES :
मुंबई – सिद्धिविनायक मंदिराकडून शहिदांच्या कुटुंबीयांना 51 लाखांची मदत,सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती
शहीद जवानांच्या पार्थिवाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा खांदा
पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र खात्याने समन्स बजावले, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं पाऊल
उत्तर प्रदेश पोलिसांकडून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट
पाकव्याप्त काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा विचार, पंतप्रधान मोदींकडून पर्यायांची चाचपणी
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बदलण्यावर सुरक्षा समितीचा विचार, माजी लष्करी अधिकाऱ्याकडे सूत्र सोपवण्याची शक्यता
केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली, 55 मिनिटं बैठकीत चर्चा, भारताच्या पुढच्या पावलाकडे जगाचं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सुरु, लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख, सीआरपीएफचे महासंचालक बैठकीला उपस्थित
09.50 AM : पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध जोडू नये, हिंसाचाराची आम्ही निंदा करतो – पाकिस्तान
09.27 AM : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात, पंतप्रधान मोदी, अजित डोबाल, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणंत्री उपस्थित, मोठ्या निर्णयाची शक्यता
09.37 AM : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
09.27 AM : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आता 11 ऐवजी 12 वाजता पुलवामाला जाणार
09.00 AM : दहशतवादी इंटरनेट ग्रुपवरुन एकमेकांच्या संपर्कात होते, CRPF च्या हालचालींची माहिती दहशतवाद्यांना कशी मिळाली, याची चौकशी सुरु, सूत्रांची माहिती
09.00 AM : केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन परदेशातून परतल्या
08.40 AM : 12 सदस्यांची समिती पुलवामा जाऊन चौकशी करणार
08.37 AM : पुलवामा हल्ल्याचा उत्तर देण्याची तयारी सुरु, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत लष्करप्रमुख बिपीन रावत देखील सहभागी होणार
07.55 AM : NIA, NSG आणि CFSL ची पथकं सोबत घेऊन सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुलवामात पोहोचणार
07.55 AM : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक, पंतप्रधान मोदी, अजित डोबाल यांच्यासह संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्रीही उपस्थित राहणार, या बैठकीनंतर भारताचं पुढचं पाऊल ठरेल
07.42 AM : जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद
07.40 AM : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री उपस्थित राहणार, सकाळी 9.15 वाजता महत्त्वपूर्ण बैठक
07.36 AM : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9.15 वाजता महत्त्वपूर्ण बैठक
07.34 AM : देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि NIA, NSG ची पथकं सकाळी 10 वाजता पुलवामात पोहोचणार
उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला
उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सैन्याकडून वाहतूक बंद करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. याशिवाय पुलवामा, शोपिया, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. जखमी जवानांवर उपचार सुरु असून वरिष्ठ अधिकारीही घटनेवर नजर ठेवून आहेत.