Pulwama Attack : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर उभा असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. CRPF च्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला. उरीमध्ये […]

Pulwama Attack : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर उभा असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. CRPF च्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार दहशतवाद्यांना ठार करण्यात येत आहे. यामुळे जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना धास्तावली आहे. भारतीय जवान जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत होते. सूत्रांनुसार, पुलवामा येथे घडवून आणलेला हा भ्याड हल्ला हा याच दहशतवादविरोधी कारवायांच्या बदल्यात घडवून आणला गेला.

तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकच्यामदतीने दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत, तर 20 जवान जखमी आहेत. मात्र, हा काही पहिला आयईडी हल्ला नव्हे. तर याआधीही दहशतवाद्यांनी अनेक आयईडी हल्ले केले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे या उद्देशाने आयईडी ब्लास्ट केला जातो. 2016 सालीही पठानकोट येथील एअरबेसमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला होता, यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले होते.

आयईडी ब्लास्ट आणि जैश-ए-मोहम्मद

पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांनुसार, डिसेंबर 2018 मध्ये जैश-ए-मोहम्मदचा मुख्य प्रशिक्षक अब्दुल रशीद गाझी हा जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्यात यशस्वी झाला आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाझी हा अफगानिस्तान येथील तालिबानींच्या टोळीत होता. त्याशिवाय तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैशच्या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य प्रशिक्षकही होता. गाझी हा आयईडीमध्ये तज्ञ आहे. पुलवामामध्ये हल्ला करणाऱ्या आदिल डारला (Adil Ahmad Dar) या गाझीनेच प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. अब्दुल रशीद गाझी हाच या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय म्हणून अब्दुल रशीद गाझीची ओळख आहे.

आयईडी ब्लास्ट किती घातक असतो?

आयईडी हा एकप्रकारचा बॉम्ब असतो, पण हा इतर बॉम्बपेक्षा वेगळा असतो. मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे या उद्देशाने दहशतवादी आयईडी ब्लास्ट करतात. आयईडी ब्लास्ट होताच घटनास्थळी आग लागते, कारण यामध्ये घातक अशा केमिकलचा वापर केला जातो ज्यामुळे आग लागते. दहशतवादी बहुतेकदा रस्त्याच्या कडेला आयईडी लावतात. जेणेकरुन यावर पाय पडताच किंवा गाडीचे चाक याला स्पर्श करताच स्फोट व्हावा. आयईडी ब्लास्टमध्ये धूरही मोठ्या प्रमाणात होतो.

आयईडी ब्लास्ट करण्यासाठी दहशतवादी रिमोट कंट्रोल, इंफ्रारेड, मॅग्नेटीक ट्रिगर्स, प्रेशर-सेंसिटिव्ह बार्स, ट्रीप वायर्स यांसारख्या पद्धतींचा वापर करतात. अनोकदा याला रस्त्याच्या कडेला तारेच्या मदतीने पसरवले जाते.

याआधी कुठे आणि कधी झाला आयईडी ब्लास्ट?

13 जुलै 2011 ला जम्मू-काश्मीर येथे तीन आयईडी ब्लास्ट करण्यात आले होते. हे हल्ले मुंबई येथे झालेल्या हल्ल्यांदरम्यान झाले होते. यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 130 जखमी झाले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2013 रोजी हैदराबाद येथे आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट येथेही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता, या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.