Pune Corona Death | पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 24 तासात 5 जणांचा मृत्यू
पुण्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Pune Corona Death) आहे.
पुणे : पुण्यात कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Pune Corona Death) आहे. आज (8 एप्रिल) पुण्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एकूण 175 कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. यापैकी 18 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. एकूण कोरोना रुग्णांपैकी पुण्यातील 4 कोरोना रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यामुळे मृतांची आकडेवारी वाढण्याचा धोका आहे.
पुण्यात आज दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला (Pune Corona Death) आहे. यात एका 44 वर्षीय पुरुषाचा, तर एका 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या पुरुषाला मधुमेहाचाही त्रास होता. तर पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेला एकापेक्षा अधिक आजार होते, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान पुण्यात गेल्या 24 तासात म्हणजे काल (7 एप्रिल) सकाळी 9 ते आज (8 एप्रिल) सकाळी 9 पर्यंत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात पाचपैकी चार रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. तर एका मृताचे वय हे 44 वर्षे आहे. या मृतांमध्ये चार पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.
यात मंगळवारी (7 एप्रिल) सकाळी 9 ते 11 या वेळेत तिघांचा मृत्यू झाला होता, तर संध्याकाळी ससूनमध्ये एक महिला दगावली. त्यानंतर रात्री उशिरा डॉ. नायडू रुग्णालयात 44 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात आता कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली (Pune Corona Death) आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 56. नागपूर – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 57. मुंबई – 72 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 58. मुंबई – 48 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 59. मुंबई – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 60. मुंबई – 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 7 एप्रिल 61. मुंबई – 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 62. मीरा भाईंदर – 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 63. मुंबई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 64. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 65. पुणे – 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 66. पुणे – 55 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल
दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. मुंबईत आतापर्यंत 642 जणांना कोरोनाची लागण लागण झाली आहे. तर राज्यात 1 हजार 018 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यत मुंबईत 40 आणि राज्यात 64 जणांचा मृत्यू झाला (Amravati Corona Positive) आहे.
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच
17 तज्ज्ञांचा सल्ला, केरळचा जबरदस्त लॉकडाऊन प्लॅन महाराष्ट्रही राबवणार?
घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांना बेड्या ठोकणार, मुंबई महापालिकेचं कडक पाऊल