पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू

पुण्यात आज (4 मे) चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हे चारही रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत (Pune Corona Death Update) होते.

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 4:34 PM

पुणे : राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढत चालला (Pune Corona Death Update) आहे. पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोना बळी आहे. पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 106 वर पोहोचला आहे.

पुण्यात कोरोनामुळे पोलीस दलातील 57 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला (Pune Corona Death Update) आहे. या पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. संबंधित पोलीस हे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान पुण्यात सकाळपासून 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. हे चारही रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत होते.

यातील तिन्ही मृत रुग्ण हे 60 वर्षे वयोगटाच्या पुढील आहे. तर एका कोरोनाबाधित मृताचे वय हे 50 आहे. पुण्यात आज झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये दोन जण हे येवला परिसरातील आहेत. पुण्यात आतापर्यंत 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 115 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यापाठोपाठ पुणे शहरातही ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने शतक ओलांडलं. तर पुणे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात कालच्या दिवसात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने संख्या 2051 वर पोहोचली (Pune Corona Death Update) आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्या

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण- 2051

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण- 1813

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्ण- 122

पुणे ग्रामीण कोरोनाबाधित रुग्ण- 43 (हवेली- 25, जुन्नर- 1, शिरुर- 2, मुळशी- 1, भोर- 3, वेल्हा- 8, बारामती- 1, इंदापूर- 1, दौंड- 1)

कँटॉनमेंट आणि नगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण- 73 (बारामती नगरपालिका- 7, पुणे कँटॉनमेंट- 43, खडकी कँटॉनमेंट- 21, देहूरोड कँटॉनमेंट- 2)

संबंधित बातम्या : 

पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी तीन रुग्णालय, 50 बेड्स राखीव

पुणे जिल्ह्यात 139 नवीन कोरोनाबाधित, 24 तासात सात रुग्ण दगावले

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.