पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, जनता वसाहतीत 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यात गेल्या 61 दिवसांपासून सुरक्षित असलेल्या जनता वसाहतीत (Pune Corona Update) कोरोनाने शिरकाव केला आहे.

पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव, जनता वसाहतीत 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 9:05 AM

पुणे : पुण्यात गेल्या 61 दिवसांपासून सुरक्षित असलेल्या जनता वसाहतीत (Pune Corona Update) कोरोनाने शिरकाव केला आहे. जनता वसाहतीमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु होता. प्रशासनाने तिनही रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांचीदेखील चाचणी केली. त्या सर्वांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Pune Corona Update).

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झोपडपट्ट्यांमध्ये पसरलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला घाम फुटत आहे. मालेगाव आणि नागपुरातील दाट वस्तीचे परिसर, मुंबईतील धारावी झोपडपट्टी आणि पुण्याच्या दाट वस्ती असलेल्या पेठांमध्येही कोरोनाचं थैमान सुरु आहे. मात्र, पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या जनता वसाहतीत गेल्या 61 दिवसांपासून कोरोना पायदेखील ठेवू शकला नव्हता. नागरिकांनी दाखवलेली शिस्त आणि संयममुळेच ते शक्य झालं.

पुण्याच्या पर्वती टेकडीच्या पायथ्याला जनता वसाहत वसली आहे. सुमारे 100 एकर पर्वती टेकडीच्या उताऱ्यावर ही जनता वसाहत वसलेली आहे. जनता वसाहतीची लोकसंख्या 70 हजार इतकी आहे. पुण्यातील पेठा आणि दाट वस्तींचे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मात्र, जनता वसाहतीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. जनता वसाहतीत प्रशासनाने केलेलं नियोजन आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद या दोन गोष्टींमुळे जनता वसाहतीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी जनता वसाहतीच्या नागरिकांचं नियोजन

  •  कंटेनमेंट झोनमध्ये नसूनही दुकानं सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असतात.
  • वसाहतीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्यात आलं आहे.
  • वसाहतीच्या 5 प्रवेशद्वारांपैकी फक्त एकाच प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जातो.
  • पर्वती टेकडीवर जाणारे रस्ते आणि पायवाटाही बंद करण्यात आल्या आहेत.
  • भाजी खदेदीसाठी बाहेर जावं लागू नये म्हणून स्वस्त दरात घरपोच भाजीची सुविधा
  • वसाहतीतील जनता रुग्णालयात 150 ते 200 जणांची मोफत तपासणी केली जाते.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार पार, दिवसभरात 67 मृत्यू, 1606 नवे रुग्ण

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....