इंजिनिअरिंगच्या लॉजिकने शेतात मॅजिक, दौंडच्या ‘अंजिर किंग’ची वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल

दौंड तालुक्यातील खोर गावचा इंजिनिअर शेतकरी समीर डोंबेने अंजिरांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई केली.

इंजिनिअरिंगच्या लॉजिकने शेतात मॅजिक, दौंडच्या 'अंजिर किंग'ची वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 7:12 PM

दौंड (पुणे) : इंजिनिअरिंगनंतर 40 हजाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी समीर डोंबेला वेड्यात काढलं. मात्र या अभियांत्रिकी शेतकऱ्याने स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण केली आणि वर्षातच एक कोटींची उलाढाल करुन दाखवली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या शेतकऱ्याचं शेतीतील मॅजिक पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in Anjeer Fig Farming)

समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.

समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम

समीरने काही वर्षांपूर्वी शेतीमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. त्यातील बाजार यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रयत्न करुन त्याने स्वतःची विपणन व्यवस्था सुरु केली. अंजिरापासून त्याने जॅम, जेली बनवले. “डोंबे पाटील” या नावाने कंपनी स्थापन करुन अंजिराला “पवित्रक” हे ब्रँडनेम दिले आहे. सध्या विविध मॉल, सुपर मार्केटमध्ये त्याने अंजीर विक्रीसाठी ठेवले आहेत.

वीस टन अंजिरांची सुरक्षित विक्री करताना त्यातून सुमारे 13 लाख रुपयांचा व्यवसाय समीरने केला. यामध्ये त्याने काही माल पॅकिंग केला आणि पुण्याच्या सोसायटीत विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, किंवा जिथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) अशा ठिकाणी पॅकिंग करुन विकला.

इतर शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ

लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या शेतातील अंजिरासोबत समीरने आपल्या कंपनीमार्फत गावातील 35 ते 40 शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. डोंबेवाडी येथे 200 ते 250 एकरात अंजिराच्या बागा असून येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुशिक्षित तरुण शेतात उतरले तर करोडोचा टर्नओव्हर करु शकतात, यासाठी आपल्या पोरांनी मार्केटमध्ये उतरलं पाहिजे, असं समीरचं म्हणणं आहे. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in Anjeer Fig Farming)

वाईन मार्केटमध्ये उतरण्याचा मानस

विक्री न झालेल्या अंजिरावर प्रक्रिया करुन त्यापासून जॅम आणि जेली बनवण्याचे काम या इंजिनिअरिंग शेतकऱ्याने सुरु ठेवले. भविष्यात त्याला अंजिरापासून वाईन बनवण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु आहेत. शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांच्या मनाला येईल, त्या भावात होणारी विक्री यामुळे थांबली आणि प्रतवारी केलेल्या अंजिराला मागणीही वाढली. एकूणच समीरने आपल्याकडे असलेल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा इतरांना फायदा करुन दिला आणि खोर या गावाला सर्वत्र अंजिराचे गाव म्हणून ओळख मिळवून दिली. समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास नक्कीच युवा वर्गातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

संबंधित बातम्या 

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीची पुण्याच्या गावडेवाडीत लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड, वर्षाला 8 ते 10 लाखांचं उत्पन्न, नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

(Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in Anjeer Fig Farming)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.