पुणे : राज्यात अतिवृष्टीनं हाहाकार माजला असताना पुण्यात मात्र भयानक परिस्थिती आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यानंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (pune heavy rain yellow alert till Thursday in pune and Maharashtra weather alert)
अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तेथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.
आज सोमवारपासून या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात आजपासून गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 20) हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तविला. (pune heavy rain yellow alert till Thursday in pune and Maharashtra weather alert)
Weather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, हवामान खात्याचा इशारा
यादरम्यान 24 तासांमध्ये 15.6 ते 64.4 मिलिमीटर पाऊस पडेल, असxही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 21,22 आणि 23 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. यामध्ये शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली होती. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने साठवलेले अन्नधान्यही भिजले होते.
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 19 October 2020https://t.co/bPcAX9UyeH
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
(pune heavy rain yellow alert till Thursday in pune and Maharashtra weather alert)