Lockdown : अखेर ऊसतोड कामगार त्यांच्या गावी रवाना होणार!
ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. आजपासून हे ऊसतोड कामगार त्यांच्या गावाकडे रवाना होणार आहेत.

पुणे : ऊसतोड मजूर आणि त्यांच्या (Migrant Workers) कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर आजपासून हे ऊसतोड (Migrant Workers) कामगार त्यांच्या गावाकडे रवाना होणार आहेत.
कुठे किती ऊसतोड कामगार?
पुणे विभागात तब्बल 1 लाख 18 हजार 209 ऊसतोड कामगार आहेत. यापैकी 77 हजार 158 ऊसतोड कामगार गावी रवाना होतील. तर 40 हजार 951 कामगार हे ऊसतोडणी करतील. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 32 कारखान्यातील कामगार हे वैद्यकीय तपासणी करुन वाहनांमधून त्यांच्या गावी रवाना होणार आहेत.
धनंजय मुंडे यांचा निर्णय
ऊस हंगाम संपला असला तरी लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. मात्र, पावसामुळे हाल होतं असल्यानं आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या स्वगृही परतण्याचा (Migrant Workers) मार्ग मोकळा केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर!
तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा. pic.twitter.com/Vg4sjrULOs
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 17, 2020
पंकजा मुंडेंचं आवाहन
दरम्यान, याप्रकरणी ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) आक्रमक पावित्रा घेतला होता. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!! pic.twitter.com/Is2bTxKnfv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2020
कोल्हापुरातील ऊसतोड मजुरांची मागणी
कोल्हापूरातील शिरोळमध्ये झालेल्या वादळी पावसाने दत्त सहकारी साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मजुरांच्या 500 हून अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या. उरलं-सुरलं धान्य भिजले तसेच अन्नात पाणी साचले. अंथरुण पांघरुन भिजले.
पालाची काठी डोक्यात पडल्यानं एक महिला ही किरकोळ जखमी झाली. पाऊस गेल्यानंतर काही क्षणात हजारो ऊसतोड मजुरांनी एकत्र येत गोंधळ सुरू केला. ऊस हंगाम संपला असला मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. त्यातचं आता पावसामुळं हाल होतं असल्यानं आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे (Migrant Workers) केली होती.
संबंधित बातम्या :
जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार
नागपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह
धक्कादायक! क्वारंटाईनसाठी दिलेल्या शिक्क्यांची शाई निकृष्ट, पाण्याने धुवून लोक घराबाहेर