Pune : पुण्यात मनसेकडून हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द, पोलिसांनी दिली मनसैनिकांना समज
मनसैनिकांनी स्पिकरवर हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. पुणे पोलिसांनी समज दिल्यानंतर मनसैनकांनी हा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली.
पुणे : मनसैनिकांनी (MNS) स्पिकरवर हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. पुणे पोलिसांनी (Pune) समज दिल्यानंतर मनसैनकांनी हा कार्यक्रम रद्द केलाय. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार असल्याच मनसेच्या कसबा पेठ शाखेचे सुरज पंडित यांनी सांगितलं होतं. मात्र, मनसेचे स्पिकर मीठगंज पोलीस (pune police) चौकीच्या बाहेर लावण्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना समज दिली. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली.
Published on: Apr 04, 2022 11:25 AM
Latest Videos