पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?

ण्यातल्याच आरोग्य व्यवस्थेने 'टीव्ही 9'च्या पुण्याच्या प्रतिनिधींचा जीव घेतला.

पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 11:19 PM

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट येऊन 5 महिने झाले. (Pandurang Raykar Died By Corona) पण, अजूनही आपल्या सरकारला रुग्णांसाठी बेड आणि अ‍ॅब्युलन्स वेळेत देता येत नाही. याचं मुर्दाड व्यवस्थेनं आमचा ‘टीव्ही 9’चा सहकारी, पुण्याचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचा जीव घेतला. व्हेंटिलेटर बेड आणि अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला (Pandurang Raykar Died By Corona).

पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला आहे. पुण्यातल्याच आरोग्य व्यवस्थेने ‘टीव्ही 9’च्या पुण्याच्या प्रतिनिधींचा जीव घेतला. पुण्यात बातम्या कव्हर करतानाच पांडुरंग रायकरांना कोरोनानं गाठलं. पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि ताप आला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले. 27 ऑगस्टला पांडुरंग यांनी कोरोना चाचणी केली. मात्र, टेस्ट निगेटिव्ह आली.

28 ऑगस्टला पांडुरंग कोपरगावला आले. तिथेही त्रास झाल्यावर अँटिजेन टेस्टमध्ये पांडुरंग पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पांडुरंग यांना उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पुण्यातल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये 30 ऑगस्टला दाखल केलं. पण, हॉस्पिटल फक्त नावापुरतंच जम्बो आहे हे सिद्ध झालं. सुविधांअभावी ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली आल्याने पांडुरंगची तब्येत खालावली.

त्यामुळे मंगळवारी पुण्यातल्या रुग्णालयातील ऑक्सिजन बेडचा शोध पांडुरंगच्या सहकाऱ्यांनी सुरु केला. पण पुण्यात व्हेंटिलेटर बेड तात्काळ उपलब्ध झाला नाही. नंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक बेड उपलब्ध झाला. मात्र, कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही. रात्री उशिरा अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली, तर त्यातील व्हेंटिलेटर खराब होता (Pandurang Raykar Died By Corona).

त्यानंतर दुसरी अ‍ॅम्बुलन्स मिळवण्याचे प्रयत्न केले. तर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. बुधवारी पहाटे 5 वाजता दिनानाथ मंगेशकरकडून अ‍ॅम्ब्युलन्स मिळाल्याचं सांगण्यात आलं. पण, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचेपर्यंत उशीर झाला. साडे 5 वाजता अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली, पण तोपर्यंत पांडुरंग रायकरचा मृत्यू झाला होता.

पांडुरंग रायकर गेल्यानं त्यांच्या घरात फक्त आक्रोश आहे. वेळेत हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही आणि जेवणाचा डब्बा पाठवला तर तोही पांडुरंगपर्यंत पोहोचला नाही. काय कामाची अशी व्यवस्था?, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पांडुरंग यांच्या बहिणीनं दिली.

42 व्या वर्षी पांडुरंग रायकराचा आरोग्य व्यवस्थेनंच बळी घेतला. ई-टीव्ही मराठी, एबीपी माझा ते ‘टीव्ही 9’मराठी अशी 15 वर्षे पांडुरंगने पत्रकारिता केली.

शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. मुळचे नगर जिल्ह्यातील पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

पुण्यात कोरोनामुळे स्थिती किती वाईट झाली. रुग्णांना बेड मिळत नाही. अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, हेच पांडुरंग आजवर त्याच्या रिपोर्टिंगमधून सांगत आला. पण, आज तोच त्याच आरोग्य व्यवस्थेचा बळी ठरला. नामांकित चॅनलच्या पत्रकाराचीच ही अवस्था असेल, तर गोरगरिब आणि सर्वसामान्यांचं काय? हा सवाल ‘टीव्ही-9’चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना आहे.

Pandurang Raykar Died By Corona

संबंधित बातम्या :

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प

होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.