Pune Rains LIVE: मुसळधार पावसानं कात्रज उड्डाणपुलाचा रस्ता उखडला

आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Pune Rains LIVE: मुसळधार पावसानं कात्रज उड्डाणपुलाचा रस्ता उखडला
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 1:06 PM

[svt-event date=”15/10/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”15/10/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महापौरांची नुकसानग्रस्त भागात पाहणी” date=”15/10/2020,12:52PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. कोथरूड परिसरातील नाल्याची संरक्षण भिंत पडलीय त्याची पाहणी केली केली. यावेळी महापालिकेच्या अधिकारी महापौरासोबत उपस्थित होते. स्थानिक नागरीकांकडून महापौरानी नुकसानीची माहिती घेतली. [/svt-event]

[svt-event date=”15/10/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] महापौर मुरलीधर मोहोळ नुकसानग्रस्त कोथरूड परिसरात पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसानं कात्रज उड्डाणपुलाचा रस्ता उखडला ” date=”15/10/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज उड्डाण पुलाचा रस्ता उखडला आहे. वाहतूकदारांना त्रासाला सामोर जावं लागत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पाटील रुग्णालयात तळमजला पाण्याखाली, रुग्णांचे हाल” date=”15/10/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] सिंहगड रोड परिसरातील पाटील हॉस्पिटलमध्ये पाणी घुसलं आहे. हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर सर्वत्र पाणी आणि चिखल झाला आहे. हॉस्पिटलमधील एक्सरे मशीन, सोनाग्राफी मशीन खराब झाली आहेत. तर खालच्या मजल्यावरील रुग्णांना सर्व वरच्या मजल्यावर हलवण्यात आलेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात पावसाचा कहर, पाहा संपूर्ण अपडेट live” date=”15/10/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील बहुतेक भाग हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रात्रभर संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरत असला तरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  [/svt-event]

पुण्यात जिकडे तिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचाच एक भयानक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी शहरात पूर आल्यासारखं पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथकं सज्ज असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. पुण्यात परतीच्या पावसाने वेग धरला असून 2019 ची परिस्थिती पुण्यात पुन्हा होताना दिसत आहे. जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले.

सिंहगड रस्ता परिसरात वाहने वाहून गेली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कृपया या भागातून जाण्याचं टाळावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.