रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट

यासगळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आली आहे.

रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 11:14 AM

पुणे : ‘रात गयी बात गयी’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल बोलणं टाळणं आहे. (raat gayi baat gayi bjp chandrakant patil commented on eknath khadse) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर आता राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. यासगळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आली आहे.

यानंतर आज मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर बोलणं टाळलं आहे. ‘रात गयी बात गयी’ असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिलं, त्यामुळे आता भाजपनं खडसेंचा विषय सोडला का? अशी राजकीय चर्चा सुरू आहे. खरंतर, खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणतं पद देण्यार यावर चंद्रकांत पाटलांनी घणाघाती टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष असेल, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली होती. तसंच, भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. मात्र, त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवरही टिकास्त्र सोडलं होतं.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

(raat gayi baat gayi bjp chandrakant patil commented on eknath khadse)

चंद्रकांत पाटील नेकमं काय म्हणाले होते? “नाथा भाऊंवर जो अन्याय झाला त्यावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाली. नाथा भाऊंना पक्षानेही खूप काही दिलं. त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यावर काही ना काही तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात ते बघुया”, असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली.

तुमच्या खात्यात परत येतील पैसे, कर्जाच्या व्याज सवलती संदर्भात सरकारकडून गाइडलाईन्स जारी

“2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी सांगावं. तुमच्याकडेही अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथा भाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही समाधान होतं. त्यामुळे आता त्यांना तो लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथाभाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असं म्हणतात, हे पाहावं लागेल”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि खडसेंवर निशाणा साधला. तसेच, “एकट्या देवेंद्रजींना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात”, असंही ते म्हणाले.

(raat gayi baat gayi bjp chandrakant patil commented on eknath khadse)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.