मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील

"शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत", असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray).

मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 9:35 PM

अहमदनगर : “कोरोनाच्या संकंटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?”, असा खोचक सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

“केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही”, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला. भाजपतर्फे आज (19 मे) राज्यभरात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आलं. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून विखे पाटलांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

“शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावं”, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

“शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत”, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांना लगावला.

“परप्रांतिय कामगारांसाठी उपाययोजना नाहीत. मजुरांची जीवघेणी पायपीट सुरु आहे. मात्र त्यांची कोणतीही काळजी सरकारला नाही. राज्याच्या विकासात परप्रांतियांचादेखील वाटा आहे. मात्र राज्य सरकारकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही”, अशी टीका विखे पाटलांनी केली.

“वाधवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र अमिताभ गुप्तांना क्लिनचिट दिली गेली”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.