Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

अदानींची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची किती वाढली?; राहुल गांधींचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:35 PM

नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती भरमसाठ वाढली आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली, तुमची संपत्ती किती वाढली?, असा सवाल राहुल गांधी यांनी जनतेला केला आहे. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

राहुल गांधी यांनी ट्विटरवर अदानी यांची संपत्ती वाढल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून हा सवाल केला आहे. अदानींची संपत्ती वाढली आहे आणि तुमची? असा सवाल त्यांनी केला आहे. या वृत्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014मध्ये सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत गौतम अदानी यांची संपत्ती 230 टक्क्यांनी वाढली असून अदानी यांच्याकडे 26 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वीही राहुल यांनी अनेकदा मोदी सरकार केवळ काही उद्योगपतींसाठीच काम करत असल्याची टीका केली होती. अदानी ग्रुपने देशातील एकूण 6 विमानतळे ताब्यात घेतली आहेत. त्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. 2 नोव्हेंबर रोजी राहुल यांनी ट्विट करून या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यात त्यांनी विकास तर होत आहे. पण काही उद्योगपती मित्रांचा होत आहे, असा खोचक टोला लगावला होता.

दरम्यान, फेब्रुवारी 2019मध्ये 6 विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं. त्यात लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, बंगळूरू, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी विमानतळांचा समावेश होता. कॉम्पिटिटीव्ह बिडिंग प्रोसेसमध्ये अदानी ग्रुपने या विमानतळांचे हक्क मिळविले होते. त्यानंतर केंद्र सरकार आणि अदानी ग्रुपमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. (rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(rahul gandhi attacks central government over increasing wealth of adani group)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.