AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजी, एकटे असताना हात हलवण्यापेक्षा तुमचं मौन सोडा: राहुल गांधी

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.

मोदीजी, एकटे असताना हात हलवण्यापेक्षा तुमचं मौन सोडा: राहुल गांधी
RAHUL GANDHI
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 11:04 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यात हित मानले. परंतु, आता त्यांनी सर्वांसमोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे. एकटे असताना हात हलवण्यापेक्षा मोदींनी मौन सोडलं पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi criticized Narendra Modi)

राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला. यामध्ये राहुल यांनी कोरोनासंदर्भात सरकारकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, देशातील लघूमध्यम उद्योगांची दुरावस्था आणि हाथरस प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेला खूप मोठा फटका बसले, हे मी फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होते. मात्र, त्यावेळी नरेंद्र मोदी २२ दिवसांत आपण कोरोनाची लढाई जिंकू, असे सांगत होते. यावरुन कोणाला किती समज आहे, हे तुम्ही ठरवा, असे राहुल यांनी सांगितले.

तसेच नरेंद्र मोदी यांनी देशातील लघूमध्यम उद्योग संपवले. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत:च्या उद्योगपती मित्रांना मदत केली. तर स्वत:च्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून मोदींनी भारताचा १२०० स्क्वेअर मीटरचा भूभागही चीनला देऊन टाकला. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

या सगळ्या कारणांमुळे नरेंद्र मोदी कधीही जाहिररित्या पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. आपल्याला उत्तरे द्यावी लागतील या एकाच कारणामुळे ते चीन आणि प्रसारमाध्यमांना घाबरतात. मोदींना केवळ आपली प्रतिमा जपण्यातच रस असल्याचेही राहुल त्यांनी म्हटले. यापूर्वी काल पटियाला येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. या कायद्यांमुळे शेतीची प्रचलित व्यवस्था मोडीत निघेल. शेतकरी कॉर्पोरेट उद्योगांच्या दावणीला बांधले जातील, असा इशारा राहुल यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’

काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा

(Rahul Gandhi criticized Narendra Modi)

बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.