Mahad Building Collapse | 36 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरु, मृतांचा आकडा वाढता

महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला (Raigad Mahad Building Collapse Rescue operation) आहे.

Mahad Building Collapse | 36 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरु, मृतांचा आकडा वाढता
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 10:42 AM

रायगड : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.  या दुर्घटनेला जवळपास 36 तास उलटूनही बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. यात 41 कुटुंब राहत होते.  (Raigad Mahad Building Collapse Rescue operation)

या दुर्घटनेत 17 रहिवाशी बेपत्ता होते. त्यातील 15 जणांचा मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी आहेत. काल मध्यरात्री उशिरा मेहरुनिस्सा काझी 65 यांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तर अब्दुल काझी (70) आणि हबीबा हजवाने या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कंमरुनिस्सा अन्सारी ही बेपत्ता असलेली महिला मृतावस्थेत आढळून आली आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे :

1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.

2) नविद झमाने, वय 35 वर्ष

3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष

4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष

5) अनाेळखी स्री चा मृतदेह

6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष

7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष

8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष

9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष

10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष

11) अब्दुल काझी  वय 70 वर्ष

12) हबीबा हजवाने

मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपयांची दिले जाणार. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.(Raigad Mahad Building Collapse Rescue operation)

नेमकी घटना काय?

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे

इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला सारायला अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल, असे सांगण्यात येत आहे.  (Raigad Mahad Building Collapse Rescue operation)

संबंधित बातम्या : 

महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.