AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anvay Naik Suicide | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

रायगड : इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी आज (4 डिसेंबर) रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उद्या (5 डिसेंबर) अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. त्यामुळे […]

Anvay Naik Suicide | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 12:53 AM

रायगड : इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी आज (4 डिसेंबर) रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उद्या (5 डिसेंबर) अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्देश देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Raigad Police submit Chargesheet in Anvay Naik Suicide case Arnab Goswami and 2 other names).

अन्वय नाईक यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोटही लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये अर्णव गोस्वामी यांचंही नाव होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यानंतर गोस्वामी यांनी अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चांगलाच तापला होता. त्यामुळेच या प्रकरणावर राज्याचंच नाही, तर देशाचं लक्ष लागून आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय सुनावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.

हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता. पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावं लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

रायगड पोलिसांसाठी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी केली होती. तसेच ही हायप्रोफाईल केस असल्याने तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथक अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. (Mumbai Interior designer Anvay Naik Suicide Case Information)

संबंधित बातम्या :

सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही कारवाई का नाही? : नाईक कुटुंब

अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत

संबंधित व्हिडीओ पाहा :

Raigad Police submit Chargesheet in Anvay Naik Suicide case Arnab Goswami and 2 other names

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.