Ashok Gehlot | आता सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही : अशोक गहलोत
सचिन पायलट यांची काँग्रेस हायकमांडने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली (Rajasthan CM Ashok Gehlot first reaction Sachin Pilot removing as Rajasthan Deputy Chief Minister)
जयपूर : बंडखोरीच्या वाटेवर असलेले युवा नेते सचिन पायलट यांची काँग्रेस हायकमांडने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली (Rajasthan CM Ashok Gehlot first reaction Sachin Pilot removing as Rajasthan Deputy Chief Minister).”आता सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यापासून ते आतापर्यंतचा सर्व घडामोडींमागे भाजपचा हात आहे. भाजपनेच हा सर्व कट रचला. मध्य प्रदेशमध्ये घोडेबाजार करणारी टीम राजस्थामध्ये दाखल झाली आहे”, असा आरोप अशोक गहलोत यांनी केला.
“भाजपकडून घोडेबाजारचा प्रयत्न सुरु होता. भाजप सरकार पाडण्यासाठी कट रचत होतं. त्यामुळे अखेर काँग्रेसच्या हायकमांडला मजबुरीने सचिन पायलट यांच्याबाबत हा निर्णय घ्यावा लागला. आमचे काही मित्र चुकले. ते भाजपच्या कटाला बळी पडले आणि दिल्लीला गेले”, असं अशोक गहलोत म्हणाले.
There is nothing in Sachin Pilot’s hands, it is the BJP which is running the show. BJP has arranged that resort and they are managing everything. The same team which worked in Madhya Pradesh is at work here: Rajasthan CM Ashok Gehlot pic.twitter.com/owKbOwxKjS
— ANI (@ANI) July 14, 2020
“मी त्यांच्याबद्दल हाय कमांडकडे कधीही कोणतीही तक्रार केली नाही. तरीही गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची वागणूक विचित्र होती. ते दररोज काहीतरी वेगळं ट्विट करायचे. पण तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. राज्याच्या जनतेच्या भावनांचा तुम्ही आदर करायला हवा”, असं राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणाले (Rajasthan CM Ashok Gehlot first reaction Sachin Pilot removing as Rajasthan Deputy Chief Minister).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“मंत्रिमंडळात सर्व सहकारी असतात. कुणीही कुणाचा मालक नसतो. मी सर्वांसाठी काम केलं. कोणताही आमदार असो, तो कुठल्याही गटाचा असो, मी त्याचं काम केलं. शाळा, महाविद्यालय, रस्ता जो प्रस्ताव आणला तो मी कायदेशीरपणे मंजूर केला. इतका स्नेह आणि प्रेम देऊनही त्यांनी भाजपसोबत करार केला”, असा आरोप अशोक गहलोत यांनी केला.
“आज काँग्रेसची बैठक त्यांच्यासाठी आयोजित केली होती. पण त्यांच्यापैकी कुणीही बैठकीला आलं नाही. काही आमदार येऊ इच्छित होते. पण ते येऊ शकले नाहीत”, असं गहलोत यांनी सांगितलं.
“आमच्यासोबत 122 आमदार आहेत. यात काँग्रेसचे 107 आमदार आहेत. आता फ्लोअर टेस्टची मागणी केली जात आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करुन भाजपला समर्थन देऊन त्यांचा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे”, असं अशोह गहलोत यांनी सांगितलं.
#WATCH: The attitude was similar to the saying ‘aa bail mujhe maar’ given the tweets & statements of last few months… I’ve been impartial to all MLAs…no one is happy about the decisions & we tried to reach out but hobnobbing with BJP has taken place: Rajasthan CM Ashok Gehlot pic.twitter.com/04YqEbFcTV
— ANI (@ANI) July 14, 2020
संबंधित बातम्या :