बहाणेबाजी संपली, रकुल प्रीत सिंह एनसीबीसमोर हजर राहणार

दीपिका पदुकोणसह शुक्रवारी (25 सप्टेंबर) तिची चौकशी होणार आहे. (Rakul Preet Singh will be present for NCB inquiry tomorrow)

बहाणेबाजी संपली, रकुल प्रीत सिंह एनसीबीसमोर हजर राहणार
काही दिवसांपूर्वी 'सिंघम' अजय देवगनसोबत 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुलप्रीत सिंह तिच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. नुकताच रकुलप्रीतचा नवीन फोटोशूट समोर आला आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. रकुलप्रीतने The MAGAZINE च्या ऑगस्ट अंकासाठी फोटोशूट केला आहे. तिचे हे फोटो सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोशूटमध्ये रकुलप्रीत खूप हॉट दिसत आहे.
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 1:50 PM

मुंबई : चौकशी टाळण्यासाठी समन्स मिळालेच नाहीत, असा बहाणा करणाऱ्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आहे. समन्स स्वीकारत तिने आपला नवा पत्ता एनसीबी अधिकाऱ्यांना दिला आहे. दीपिका पदुकोणसह शुक्रवारी (25 सप्टेंबर) तिची चौकशी होणार आहे. (Rakul Preet Singh will be present for NCB inquiry tomorrow)

रकुल प्रीतने समन्स मिळाले नसल्याचे कारण पुढे करत चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ केली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मात्र तिचे दावे फेटाळून लावले. रकुल प्रीत सिंगला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समन्स देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फोनद्वारे तिला कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याचे एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले होते.

रकुल प्रीत सिंग समन्स स्वीकारत नसून, चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. तर, रकुल प्रीतला कुठलेही समन्स मिळाले नसल्याचे तिच्या टीमने म्हटले होते. त्यामुळे रकुल प्रीत सिंग आज चौकशीस हजर राहिली नव्हती.

फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांना आज (24 सप्टेंबर) एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापैकी सिमॉन खंबाटा सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून, तिची चौकशी सुरु असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे.(Rakul Preet Singh will be present for NCB inquiry tomorrow)

दरम्यान या प्रकरणी दीपिकाला शुक्रवार 25 सप्टेंबर, तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना शनिवार 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश एनसीबीने दिले आहेत.

दीपिका पदुकोण मुंबईला रवाना

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण दुपारी मुंबईत दाखल होत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उद्या (25 सप्टेंबर) दीपिकाला चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही वकिलांची जुळवाजुळव करत आहे.

दीपिका पदुकोण आज (24 सप्टेंबर) दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबईत येणार आहे. खाजगी चार्टर्ड विमानाने दीपिका गोव्याहून मुंबईला प्रवास करेल. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका सर्वात आधी वरळीतील ब्योमाँड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी जाईल. त्यानंतर पुढे काय करायचे, हे ती ठरवणार आहे.

सारा अली खानही सुट्टी घालवण्यासाठी आपल्या आई अभिनेत्री अमृता सिंह यांच्यासह गोव्यातील घरी राहत आहे. मात्र, 26 सप्टेंबरच्या चौकशीला ती हजर राहणार का? ती गोव्याहून कधी परतणार, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

(Rakul Preet Singh will be present for NCB inquiry tomorrow)

संबंधित बातमी :

Rakul Preet | समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ, एनसीबीचा दावा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.