Ayodhya Ram Mandir PHOTO | अयोध्या नगरीतील प्रस्तावित राम मंदिराचे काही फोटो
अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन (ayodhya ram mandir photo) होणार आहे.
Follow us
अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत.
अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत
श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल.
नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत.
या स्तंभांची संख्या 160 वरुन 366 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या मंदिराच्या जिन्याची रुंदी 6 फुटांवरुन 16 फूट करण्यात आली आहे.
तसेच मंदिराची उंची 141 फुटांवरुन 161 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांचे 135 संत उपस्थिती लावणार आहेत.
जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे.