दस्तुरखुद्द रणबीर कपूरही सोशल मीडियावर फेक अकाऊंट चालवतो!
मुंबई : सोशल मीडिया आता अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. अनेकजण फेक अकाऊंट उघडतात. त्यातून अनेक गुन्हेही समोर आले आहेत. मात्र, या फेक अकाऊंटच्या यादीत दस्तुरखुद्द बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरही सामील झाला आहे. रणबीरची एक्स-गर्लफ्रेण्ड आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिनेच याबाबत सांगितले. एप्रिल 2017 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर आली. […]
मुंबई : सोशल मीडिया आता अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. अनेकजण फेक अकाऊंट उघडतात. त्यातून अनेक गुन्हेही समोर आले आहेत. मात्र, या फेक अकाऊंटच्या यादीत दस्तुरखुद्द बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरही सामील झाला आहे. रणबीरची एक्स-गर्लफ्रेण्ड आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिनेच याबाबत सांगितले.
एप्रिल 2017 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर आली. कतरिनाची प्रसिद्धी पाहता, तिचा चाहता वर्ग पाहता,ती खूपच उशिरा सोशल मीडियावर आली. 2017 च्या एप्रिलमध्ये तिने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केला. सध्या या अकाऊंटला दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कतरिना इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यासाठी तिचा एक्स-बॉयफ्रेण्ड अभिनेता रणबीर कपूर याने मदत केली होती. स्वत: कतरिनाने यासंदर्भात अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच’ या कार्यक्रमात सांगितले.
यावेळी अभिनेत्री कतरिना कैफने आणखी एक गौप्यस्फोट केला. तिने सांगितले की, “मला माहित आहे रणबीरकडे फेक अकाऊंट आहे. शिवाय, इन्स्टाग्राम वापरण्याबाबत मला रणबीरनेच शिकवलं.“
रणबीर-कतरिनाचं ब्रेकअप
जवळपास सात वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफचं ब्रेकअप झालं. एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्याने ब्रेकअप झाल्याचे पुढे दोघांनीही स्पष्ट केले. ब्रेकअपनंतर कतरिन सिंगल आहे, तर रणबीर लवकरच अभिनेत्री आलिया भट्टसोबत लगीनगाठ बांधणार आहे.
यंदा म्हणजे 2019 च्या अखेरपर्यंत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे विवाहबंधनात अडकतील. कपूर किंवा भट्ट कुटुंबीयांकडून रणबीर-आलियाच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.