डिसेंबर अखेरपर्यंत भारतात कोरोनाची लस टोचली जाणार?; एम्सचे संचालक गुलेरिया म्हणतात…

गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी खूशखबर आहे. (Randeep Guleria Told That corona Vaccine Will Be Available At The End Of The Year)

डिसेंबर अखेरपर्यंत भारतात कोरोनाची लस टोचली जाणार?; एम्सचे संचालक गुलेरिया म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 5:19 PM

नवी दिल्ली: गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी खूशखबर आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात भारतात कोरोनाच्या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळेल, असा विश्वास एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला. आपल्याकडील कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून या लसीच्या वापराला लवकर मंजुरी मिळू शकते, असंही ते म्हणाले. (Randeep Guleria Told That corona Vaccine Will Be Available At The End Of The Year)

एकदा बुस्टर डोस दिल्यानंतर ही व्हॅक्सीन शरीरात चांगल्याप्रकारे अँटीबॉडी तयार करण्याचं काम करेल. त्याचा परिणाम अनेक महिने शरीरात राहिल. मात्र, आता लोकांमध्ये ही लस कशा प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण करते हे पाहावं लागणार आहे, असं गुलेरिया म्हणाले. देशात सध्या सहा लसींवर काम सुरू असून त्यातील दोन लसी अंतिम टप्प्यात असून सुरुवातीलाच एक नव्हे तर दोन -तीन व्हॅक्सीन उलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रुग्णांना कोरोनाची लस टोचण्यासाठी कोरोनाच्या लसीच्या वितरणाबाबत कठोरपणे पावलं उचलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

ही लस सुरक्षित आहे का? असं त्यांना विचारलं असता, आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात डेटा असून त्यातून लस सुरक्षित असल्याचं सिद्ध होतं, असं ते म्हणाले. लसीची सुरक्षा आणि क्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आतापर्यंत 70 ते 80 हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणतेही गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही. ही शॉर्ट टर्म लस अधिकच सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

100 टक्के लोकांना लस टोचण्याची गरज नाही

गुलेरिया यांनी लसीबाबत मोठं विधान केलं आहे. देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस टोचण्याची गरज नाही. केवळ 50 ते 60 टक्के लोकांनाच कोरोनाची लस टोचावी लागणार आहे. या लोकांना कोरोनाची लस टोचल्यानंतर देशात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

चेन्नईत ऑक्सफर्डच्या लसीच्या ट्रायलवेळी एका स्वयंसेवकावर गंभीर परिणाम झाला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या लसीचा आणि त्या व्यक्तीवर झालेल्या परिणामाचा काहीही संबंध नाही. डीसीजीआयनेही चौकशी केल्यानंतर लसीचा आणि त्या व्यक्तिवर झालेल्या परिणामाचा काही संबंध नसल्याचं आढळून आल्याचंही ते म्हणाले.

देशातील सध्याचे कोरोना अपडेट

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 35 हजार 551 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 95,34,965 झाली आहे. तर गेल्या 24 तासात 526 रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील कोरोना बळींचा आकडा 1,38,648 एवढा झाला आहे.

ऑक्सफर्ड आणि बायोटेकच्या लसीची अद्यापही प्रतिक्षा?

ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेकचे क्लिनिकल ट्रायल लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यालाही लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनेकचा लोकल पार्टनर म्हणून सिरम इन्स्टिट्यूट काम करत आहे. त्याच्या लसीच्या आपत्कालीन वापराला आगामी काळात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हॅक्सीनसाठी मोदी सरकारने विविध कंपन्यांसोबत डील केली आहे. केंद्राने Novavax सोबत 1 अब्जची डील केली आहे. तर ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनेका सोबत 500 मिलियनची डील केली आहे. तसेच रशियाच्या गेमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत 100 मिलियन व्हॅक्सीनची डील करण्यात आली आहे. मात्र, भारताने अद्याप फायझरसोबत कोणताही करार केलेला नसला तरी आगामी काळात हा करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रिटनमध्ये वापराची परवानगी

ब्रिटनमध्ये Pfizerच्या कोरना लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. कोविडच्या लसीची परवानगी देणारा ब्रिटन हा पश्चिमेकडील देशातील पहिलाच देश ठरला आहे. ज्यांना कोरोनाचा धोका आहे, त्यांनाच Pfizer/BioNTechची लस देण्यात येणार आहे. मेडिसीन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटीने या वापराला मंजुरी दिली आहे.

-70° सेल्सिअस तापमानात लस स्टोअर होणार

फायझरने त्यांची लस 95 टक्के परिणामकारक ठरल्याचा दावा केला आहे. फायझर-बायोटेकच्या लसीला -70° सेल्सिअस तापमानात ठेवावे लागणार आहे. ही लस रेफ्रिरेजटरच्या तापमानात 5 दिवस ठेवता येणार आहे. कोरोनापासून मुक्तीसाठी फायझरच्या दोन लसी घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी तीन आठवड्याचं अंतर ठेवावं लागणार आहे. (Randeep Guleria Told That corona Vaccine Will Be Available At The End Of The Year)

संबंधित बातम्या:

फायझर अव्वल, लसीकरणात ब्रिटनची आघाडी

 फायझर कंपनीच्या कोरोना लसीच्या तिन्ही चाचण्या पूर्ण

कोरोनाची लस सर्वांना मिळेल?, लस मोफत असेल?, लसीकरणाबाबत पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय?; राहुल गांधींचे तीन सवाल

(Randeep Guleria Told That corona Vaccine Will Be Available At The End Of The Year)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.