संकोच नको, खट्टरांचं सुरक्षाचक्र भेदून घरी परत या, सचिन पायलट यांना काँग्रेसची साद
सचिन पायलट यांनी भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसने पायलट यांना परत पक्षात येण्याची पुन्हा विनंती केली आहे (Randeep Surjewala Appeal to Sachin Pilot come back to Congress family)
जयपूर : बंडखोरीच्या वाटेवर असलेले राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसने पायलट यांना परत पक्षात येण्याची पुन्हा विनंती केली आहे. “तुम्ही भाजपात जावू इच्छित नसाल तर भाजप नेते आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सुरक्षाचक्राला भेदून परत आपल्या घरी जयपूरला या”, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत (Randeep Surjewala Appeal to Sachin Pilot come back to Congress family).
“सचिन पायलट तुम्ही खरच भाजपमध्ये जावू इच्छित नसाल तर मनोहरलाल खट्टर यांच्या सुरक्षाचक्राला तोडून आयटीसी ग्रँड लेमन ट्री हॉटेलमधून बाहेर पडा. भाजप नेत्यांशी चर्चा करणं बंद करा. कुटुंबाच्या सदस्यासारखं घरी परत या. काँग्रेस खुल्या मनाने तुमचं म्हणणं ऐकूण घेण्यासाठी तयार आहे”, असं आवाहन रणदीप सुरजेवाला यांनी केलं (Randeep Surjewala Appeal to Sachin Pilot come back to Congress family).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“पायलट यांच्यासोबत भरकटलेल्या प्रत्येक आमदाराला माझा सल्ला आहे की, कुटुंबात परत येण्यासाठी संकोच बाळगू नका. प्रसारमाध्यमांद्वारे बोलू नका. परिवारात या, तुमचं म्हणणं मांडा, सविस्तर चर्चा करा. हाच तुमच्या काँग्रेस निष्ठेचा पुरावा असेल”, असं सुरजेवाला म्हणाले.
“तुम्हाला जर वाटत असेल की, काँग्रेस आमदारांचं बहुमत तुमच्याजवळ आहे, तर या आणि आपलं बहुमत सिद्ध करा. तुमचा जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही घ्या”, असं आवाहन सुरजेवाला यांनी केलं.
हेही वाचा : फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, अशोक गहलोत यांचा टोला
“आम्ही काँग्रेस आमदारांची दोन वेळा बैठका बोलावल्या. सचिन पायलट आणि इतर आमदारांना आम्ही बैठकीचं निमंत्रण दिलं. त्यांना आपली बाजू मांडण्याचं आवाहन केलं. पण ते आले नाही”, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
“काँग्रेसने सचिन पायलट यांना कमी वयात अनेक चांगले पदं देत संधी दिली. खासदार ते केंद्रीय मंत्री, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक संधी देत प्रोत्साहित केलं. एवढं प्रोत्साहन तर कोणत्याच राजकीय पक्षाने कुणालाही दिलं नसेल”, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
“गेल्या पाच दिवसातही सचिन पायलट यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदारमनाने सर्व दरवाजे खुले असल्याचं सांगितलं. घरातील व्यक्ती घरापासून गेला तरी तो कुटुंबाचा सदस्य असतो. तुम्ही परत या”, असं सुरजेवाला म्हणाले.
“काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आवाहन केलं की, तुमची काँग्रेसवर खरच निष्ठा आणि प्रेम असेल तर ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हा आहात त्या हॉटेलच्या बाहेर येवून तुम्ही प्रासारमाध्यमांना काँग्रेसवर आपली संपूर्ण निष्ठा आहे, असं सांगा. मात्र, यापैकी काहीच झालं नाही. चार ते पाच दिवस वाट पाहिल्यानंतर जड अंतकरणाने आम्हाला कारवाई करावी लागली”, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.