18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता मुलीवर नजर, माजी मंत्र्यावर आरोप
बीड : राज्याचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी गेल्या 18 वर्षांपासून सतत माझ्यावर बलात्कार केला आणि आता त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याच घरात काम करणाऱ्या महिलेने केला आहे. थेट पोलिस अधीक्षकांकडे या महिलेने तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाने बीड […]
बीड : राज्याचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी गेल्या 18 वर्षांपासून सतत माझ्यावर बलात्कार केला आणि आता त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याच घरात काम करणाऱ्या महिलेने केला आहे. थेट पोलिस अधीक्षकांकडे या महिलेने तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील केसापुरी कॅम्प परिसरातील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली होती. सोळंकेंच्या स्वीय सहाय्यकाने घरातीलच तीन नोकरांवर संशय व्यक्त केला .त्यानंतर चोरीप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या घरातील नोकरांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र याप्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये. यासाठी माजी मंत्र्यांनी हे प्रकरण इथेच थांबविले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी आपली चौकशी चालूच ठेवल्याने दोन दिवसानंतर स्वयंपाक करणाऱ्या महिलेने वेगळाच आरोप करत प्रकरणाला गंभीर वळण लावलं. “माजी मंत्री हे माझ्यावर गेल्या 18 वर्षापासून सतत बलात्कार करत आहेत आणि त्यांची आता माझ्या मुलीवर नजर पडली आहे.” असा आरोप आरोप करत याची थेट पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केल्याने या प्रकरणाला एकच वेगळेच वळण लागले आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेचे आरोप काय?
“15 वर्षापूर्वी प्रकाश सोळंके माझ्यावर लैंगिक अत्याचार केले असून याची मी कोठेही वाच्यता करु नये. यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत असून माझ्या पतीसह माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी मला देण्यात येत होती. दरम्यान याप्रकरणी अद्यापही कुठेही तक्रार मी दिली नाही. जेव्हा सतत होणार्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून मी काम सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सोळंके यांनी माझ्या मुलीची मागणी केली. माझे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या माजी महसूल मंत्र्याची नजर माझ्या मुलीवर पडली. याचा विरोध करण्यासाठी माझ्यास माझ्याच्या कुटुंबांच्या जीवाची परवा न करता मी खंबीरपणे उभी राहिल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करण्यास सुरवात केली. मात्र मुलीचे आयुष्य उद्ध्वसत होऊ नये, यासाठी माझे आयुष्यपणाला लागले तरी चालेल मात्र माझ्या मुलीसोबत असे घडू नये. यासाठी या अन्यायाविरोधात मला अखेर उभे राहण्यासाठी बळ आले.” असे गंभीर आरोप घरकाम करणाऱ्या महिलेने केले आहेत.
दरम्यान, दरम्यान राज्याचे माजी महसूलमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने बीडसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता पोलिस पुढील पावलं काय उचलतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.