महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

सगळ्या भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 12:29 PM

औरंगाबाद : जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण, औरंगाबादमध्ये बलात्काराची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. (rape on 7 year old girl in aurangabad)

औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, लहान वयात असा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडितेला धक्का बसला आहे. तर आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

खरंतर, राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण काही केल्या कमी होत नाही. कुठल्याही क्षेत्रातच काय तर हल्ली मुली घरातही सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणं समोर आली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर यावर प्रशासनाने ठोस पाऊलं उचलायला हवीत असंही काहींचं म्हणणं आहे.

इतर बातम्या –

शनिवारपर्यंत राज्यावर असणार आसमानी संकट, हवामान खात्याचा इशारा

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

(rape on 7 year old girl in aurangabad)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.